पुण्यातील रुबी हॉल क्लिनिकमधील एका ४५ वर्षांच्या नर्सला करोनाची लागण झाल्याचा चाचणी अहवाल आहे. यानंतर संबंधीत नर्सच्या संपर्कात झालेल्या ३० नर्सना क्वारंटाइन करण्यात आलं आहे, अशी माहिती रुबी हॉल हॉस्पिटलचे आरोग्य सेवा संचालक संजय पाठारे यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

रविवारी पुण्यातील संगमवाडी परिसरातील एका ५८ वर्षीय महिलेसह सोमवार पेठेतील एका ५६ वर्षीय महिलेचा करोनामुळे मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. या दोन्ही महिलांना अन्य आजारांनी देखील ग्रासले होते असे देखील सांगण्यात आले आहे. ससून रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते.

पुण्यात आतापर्यंत करोनामुळे ३१ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्या ३१ रुग्णांपैकी आज २ जणांचा मृत्यू झाला आहे. तर, राज्यात आज १३४ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. एकूण रुग्ण संख्या १८९५ वर पोहचली आहे.

रुग्णालयातून डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा करोना झाल्याचं उघड

दरम्यान, राज्यातील करोनाचा केंद्रबिंद ठरलेल्या पुण्यात वेगळीच घटना समोर आली. करोनाग्रस्त रुग्णांच्या घरातील एका दाम्पत्याला डिस्चार्ज दिल्यानंतर पुन्हा करोना असल्याचं निष्पन्न झालं. करोनाग्रस्त रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर रुग्णालयानं या दाम्पत्याचे नमुने घेतले होते. मात्र, त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. घरी सोडण्यात आल्यानंतर या दाम्पत्याला करोना झाल्याचं निष्पन्न झालं आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Nurse at ruby hall clinic in pune having corona infection 30 other nurses became quarantine aau 85 svk
First published on: 12-04-2020 at 18:30 IST