scorecardresearch

Premium

ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचे भुजबळांना आव्हान : म्हणाले, ‘भुजबळांनी राजीनामा देऊन मैदानात…’

राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे आरक्षणाच्या प्रश्नामध्ये पडून हिरो होण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा बळीचा बकरा झाला आहे.

OBC leader Haribhau Rathod challenge to Bhujbal pune news
ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांचे भुजबळांना आव्हान : म्हणाले, ‘भुजबळांनी राजीनामा देऊन मैदानात…'

पुणे : राज्याचे अन्न व नागरी पुरवठामंत्री छगन भुजबळ हे आरक्षणाच्या प्रश्नामध्ये पडून हिरो होण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, त्यांचा बळीचा बकरा झाला आहे. आता त्यांनी राजीनामा देऊन मैदानात यावे, असे आव्हान माजी खासदार आणि ओबीसी नेते हरिभाऊ राठोड यांनी दिले.पुण्यात पत्रकारांशी बोलताना राठोड यांनी भुजबळ यांच्यावर टीका केली. ते म्हणाले, ‘भुजबळ हे प्रत्येक निर्णय प्रक्रियेमध्ये असतात. मात्र, कालांतराने ते वेगळी भूमिका घेतात. भुजबळ यांच्या चुकीच्या वक्तव्यांना आमचा पाठिंबा नाही’

‘आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटे पडले आहेत, दोन्ही उपमुख्यमंत्री काहीच बोलताना दिसत नाहीत. भुजबळ यांनी सभा घेऊन आणि टाळ्यांची भाषणे करून वातावरण निर्मिती केली. राज्य सरकारने ओबीसींची भीती बाळगू नये, असेही राठोड म्हणाले.‘सर्वच समाजातील नेत्यांनी संयमाने भाषा वापरावी. सध्या मनोज जरांगे-पाटील हे मराठा समाजाचे एकमेव नेते आहेत. त्यांनी ‘लायकी’ हा शब्द मागे घेतला आहे. जनतेचे समाधान होत नसेल तर त्यांनी माफी मागावी’ असे राठोड यांनी नमूद केले.

Prime Minister Modi firm assertion that the scheme is for the benefit of farmers
योजना शेतकरी हिताच्याच! पंतप्रधान मोदी यांचे ठाम प्रतिपादन
Eknath Shinde Abhishek Ghosalkar
अभिषेक घोसाळकरांच्या हत्येनंतर राज्य सरकार अ‍ॅक्शन मोडवर, कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी मोठा निर्णय
akhilesh_yadav
काँग्रेसच्या भारत जोडो न्याय यात्रेचे अखिलेश यादवांना आमंत्रण नाही? उत्तर प्रदेशमध्ये काय घडतंय?
Balaram Patil statement regarding the issue of farmers in Panvel
मुख्यमंत्र्यांना पनवेलमधील शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घ्यायचे नसल्यास आम्हाला निर्णायक लढा देण्याची वेळ आली; माजी आ. बाळाराम पाटील

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Obc leader haribhau rathod challenge to bhujbal pune print news spt 17 amy

First published on: 29-11-2023 at 05:41 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×