लोकसत्ता प्रतिनिधी

पुणे: शहरात जन्म आणि मृत्यूंची नोंदणी करण्यासाठी वापण्यात येणारी प्रणालीत अडथळे येत आहेत. त्यामुळे शहरातील जन्म-मृत्यू नोंदणीचा खोळंबा झाला आहे. केंद्र शासनाने विकसित केलेली सीआरएस प्रणाली (नागरी नोंदणी पद्धती) सध्या बंद पडली आहे. त्यामुळे ५ एप्रिलपासून जन्म-मृत्यू नोंदणी करण्यात अडचणी येत आहेत. ही प्रणाली पुन्हा सुरू होईपर्यंत नागरिकांना जन्म-मृत्यू दाखल्यांसाठी प्रतिक्षा करावी लागणार आहे.

महापालिकेकडून मार्च २०१९ पूर्वी स्वतःच्या संगणक प्रणालीद्वारे जन्म-मृत्यूंची नोंद करून शहरातील नागरिकांना जन्म-मृत्यू दाखले देण्यात येत होते. मात्र, मार्च २०१९ नंतर केंद्र शासनाने विकसित केलेल्या सीआरएस प्रणालीचा वापर सर्व ठिकाणी सुरू करण्यात आला. मात्र, ही प्रणाली ५ एप्रिलपासून बंद पडली आहे. राज्य शासनाकडून याबाबत केंद्र शासनाच्या तांत्रिक विभागाशी संपर्क करण्यात आला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, ही अडचण दूर करण्याबाबत कार्यवाही सुरु असल्याचे तसेच सीआरएस प्रणाली लवकरच सुरु होईल असे केंद्राकडून राज्य शासनाला कळविण्यात आले आहे. मात्र, ही प्रणाली पुन्हा कधी सुरू होईल हे निश्चित सांगता येणार नाही. परिणामी मार्च २०१९ नंतरचे जन्म-मृत्यू दाखले मिळण्यास नागरिकांना काही प्रतिक्षाच करावी लागणार आहे.