भारतीय जनता पक्षाचे उपाध्यक्ष प्रसाद लाड आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी समाजमाध्मयावर आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलिसांनी एकाच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.या प्रकरणी मयूर बोराळे या नावाने समाजमाध्यमावरील खातेधारकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मनीषा राजाभाऊ कदम (वय ४४) यांनी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>>दुसरी ते पाचवीच्या विद्यार्थ्यांच्या विषयनिहाय आकलनाचे मूल्यांकन

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आम्ही काँग्रेसकर या समाजमाध्यमातील खात्यातवर मयूर बोराळे भाजप नेते प्रसाद लाड आणि त्यांच्या कुटुंबीयांविषयी आक्षेपार्ह मजकूर प्रसारित केला होता. ही बाब मनीषा कदम यांच्या लक्षात आली. त्यानंतर कदम यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. माहिती-तंत्रज्ञान कायदा तसेच बदनामीकारक मजकूर प्रसारित केल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक शिंदे तपास करत आहेत.