पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या (पीएमपी) अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपदी ओमप्रकाश बकोरिया यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पीएमपीचे विद्यमान अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक लक्ष्मीनारायण मिश्रा यांच्या जागेवर बकोरिया यांची बदली करण्यात आली असून राज्य शासनाने त्याबाबतचे आदेश काढले आहेत. बकोरिया येत्या काही दिवसांत पदभार स्वीकारतील, अशी माहिती पीएमपीकडून देण्यात आली.

हेही वाचा- खड्डे बुजविल्याच्या खर्च देण्यास महामेट्रो, ‘पीएमआरडीए’कडून टाळाटाळ

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचे स्वीय सहाय्य म्हणून लक्ष्मीनारायण मिश्रा यांची नेमणूक दिल्ली येथे करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या काही महिन्यांपासून पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकपद रिक्त होते. त्यामुळे ओमप्रकाश बकोरिया यांची या जागेवर नियुक्ती करण्यात आली आहे.

हेही वाचा- पुणे : शहराच्या पूर्व भागात रविवारी कमी दाबाने पाणीपुरवठा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

ओमप्रकाश बकोरिया यांनी पुणे महापालिकेत अतिरिक्त आयुक्त म्हणून कार्यभार सांभळला होता. त्यानंतर त्यांची बदली क्रीडा आयुक्त म्हणून करण्यात आली होती. महापालिकेत कार्यरत असताना वाहतूक कोंडी सोडविण्यासाठी त्यांनी सातत्याने उपाययोजना करण्यावर भर दिला होता. आळंदी रस्ता आणि नगर रस्ता बीआरटी मार्गाचे कामही त्यांच्या कार्यकाळात पूर्ण झाले. तसेच या दोन्ही मार्गांचे लेखापरीक्षणही त्यांनी करून घेतले होते. त्यांच्याकडे पीएमपीचा कार्यभार आल्याने पीएमपीच्या कामकाजात लक्षणीय सुधारणा होण्याची शक्यता आहे.