विद्युत रोहित्र की बंद पडलेल्या कंपनीत स्फोट?

आळंदीत भीषण स्फोट होऊन एकाचा मृत्यू झाला असून सात जण जखमी झाले आहेत. ही घटना पाच च्या सुमारास आळंदीतील साळू गावात घडली. अद्याप नेमकं डीपी (विद्युत रोहित्र) की बंद असलेल्या कंपनीत स्फोट झाला हे समजू शकलं नाही. त्याचा तपास पोलीस करत आहेत. स्फोट झाल्याने पन्नास मीटर अंतरातील परिसरात हादरला. मोठी हानी झाली आहे. अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

हेही वाचा >>> राज्य सरकारचा गुगलबरोबर करार, विविध क्षेत्रात AIचा वापर वाढणार, मग रोजगार घटणार? देवेंद्र फडणवीस म्हणाले…

Mumbai, Dead bodies of two children,
मुंबई : जुन्या मोटरीत दोन चिमुरड्यांचा मृतदेह सापडला, गुदमरून मृत्यू झाल्याचा संशय
24-year-old young man died due to heart attack while practicing for police recruitment
धक्कादायक! पोलीस भरतीचा सराव करताना २४ वर्षीय तरुणाचा ‘हार्टअटॅक’ने मृत्यू
125 people poisoned because of Mahaprasad One is dead six people are serious
चंद्रपूर : महाप्रसादातून १२५ जणांना विषबाधा; एकाचा मृत्यू, सहा जण गंभीर
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी | Worker died after crane hook fell on his head
नाना पेठेत दुर्घटना! क्रेनचा हुक डोक्यावर पडून कामगार मृत्युमुखी

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आळंदीतील साळू गावात भीषण स्फोट झाला आहे. रस्त्यावर उभा असलेल्या व्यक्तीचा घटनेत मृत्यू झाला आहे. घरातील आणि रस्त्यावरील इतर सात जण जखमी झाले आहेत. ही घटना नागरीवस्तीत घडली. ज्या ठिकाणी स्फोट झाला आहे, तिथं अल्युमिनियम प्लेट तयार करणारी कंपनी आहे. ती गेल्या चार वर्षांपासून बंद आहे. मात्र, कंपनीतच भीषण स्फोट होऊन डीपी ला आग लागली असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. त्या दिशेने पोलीस तपास करत आहेत. या गंभीर घटनेत एका व्यक्तीच्या जीव गेला असून सात जण जखमी आहेत.