एकतर्फी प्रेमातून झालेल्या श्वेता रानवडे हिच्या खून प्रकरणी तक्रारीची दखल न घेतल्याने तीन पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई कारवाई करण्यात आली आहे. श्वेताला त्रास देणाऱ्या तरुणाची तक्रार दिल्यानंतर दखल न घेतल्याने चतु:शृंगी पोलीस ठाण्यातील उपनिरीक्षक वैशाली सूळ यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश देण्यात आले. वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली; तसेच पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ओैंध भागात श्वेता रानवडे (वय २६) हिचा एकतर्फी प्रेमातून आरोपी प्रतीक ढमाले याने चाकूने वार करुन खून केला होता. तिचा खून केल्यानंतर ढमालेेने मुळशी धरण परिसरात झाडाला गळफास घेऊन आत्महत्या केली होती. ढमाले हा श्वेताला त्रास देत होता. श्वेताच्या कुटुंबीयांनी याबाबत चतु:शृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली होती. श्वेताच्या तक्रारीची दखल न घेतल्याचे चौकशीत आढळून आले. प्राथमिक चौकशीत पाेलीस उपनिरीक्षक वैशाली सूळ दोषी आढळल्यानंतर सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक आणि अतिरिक्त पोलीस आयुक्त डाॅ. जालिंदर सुपेकर यांनी सूळ यांना पोलीस दलातून निलंबित करण्याचे आदेश दिले.

हेही वाचा: आळंदीत वैष्णवांचा मेळा; ज्ञानेश्वर माऊलींचा ७२६ वा संजीवन समाधी सोहळा संपन्न

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार वाघचवरे यांची पोलीस नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली तसेच पोलीस उपनिरीक्षक शामल पाटील यांची विशेष शाखेत बदली करण्यात आली. तरुणीच्या कुटुंबीयांनी तक्रार दिल्यानंतर दखल घेण्यात आली नसल्याचा ठपका ठेवून ही कारवाई करण्यात आली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: One sided love murder suspend three police officers for not heeding the complaint pune police pue print news tmb 01
First published on: 22-11-2022 at 13:02 IST