पुणे: आषाढी एकादशीनिमित्त पंढरपूर येथे मोठ्या संख्येने भाविक जातात. त्यामुळे आषाढी वारीच्या काळात प्रवाशांची मोठी गर्दी होते. ही गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेने ७६ विशेष गाड्या सोडण्याचे नियोजन केले आहे. मध्य रेल्वे नागपूर-मिरज, नागपूर-पंढरपूर, नवीन अमरावती-पंढरपूर, खामगाव-पंढरपूर, भुसावळ-पंढरपूर, लातूर-पंढरपूर, मिरज-पंढरपूर, मिरज-कुर्डूवाडी या मार्गावर ‘पंढरपूर आषाढी एकादशी’ विशेष गाड्या चालवणार आहे.

नागपूर-मिरज विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत. ही गाडी २५ व २८ जूनला नागपूरहून सुटेल आणि मिरजहून २६ व २९ जूनला सुटेल. नागपूर-पंढरपूर विशेष गाडीच्या चार फेऱ्या होणार आहेत. नागपूरहून ही गाडी २६ व २९ जूनला आणि पंढरपूरहून २७ व ३० जूनला रवाना होईल. नवीन अमरावती-पंढरपूर विशेष गाडीच्याही चार फेऱ्या होणार आहेत. ही गाडी नवीन अमरावती येथून २५ व २८ जूनला आणि पंढरपूरहून २६ व २९ जूनला रवाना होईल.

आणखी वाचा-पुण्यातील प्रसिद्ध वैशाली हॉटेल वादात, बंदुकीच्या धाकाने केला ‘हा’ प्रकार

खामगाव-पंढरपूर विशेष गाडीच्या चार फेऱ्या होतील. ही गाडी खामगावमधून २६ व २९ जूनला आणि पंढरपूरहून २७ व ३० जूनला सुटेल. भुसावळ-पंढरपूर विशेष दोन फेऱ्या होणार आहेत. ही गाडी भुसावळहून २८ जूनला आणि पंढरपूरहून २९ जूनला रवाना होईल. लातूर-पंढरपूर गाडीच्या आठ फेऱ्या होणार आहेत. ही गाडी लातूरमधून २३, २७, २८ व ३० जूनला आणि पंढरपूरहून २३, २७, २८ व ३० जूनला सुटेल.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दक्षिण मध्य रेल्वेकडून सहा अतिरिक्त गाड्या

दक्षिण मध्य रेल्वेकडूनही आषाढीनिमित्त विशेष गाड्या सोडल्या जाणार आहेत. जालना-पंढरपूर, पंढरपूर-नांदेड, औरंगाबाद-पंढरपूर आणि आदिलाबाद-पंढरपूर दरम्यान “पंढरपूर आषाढी एकादशी” विशेष गाड्या चालवणार आहे.