शिवसेना नाव नसताना पक्ष मोठा करणे हे उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा प्रश्न आहे. सध्याचा काळ हा कसोशीचा असून एक कार्यकर्ता नेता होऊन पक्षाचे नेतृत्व करू शकतो. हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले आहे, असे मत भाजपाच्या नेत्या पंकजा मुंडे यांनी व्यक्त केले आहे. त्या पिंपरी- चिंचवड शहरातील राहटणी येथे प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या. भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारार्थ आज सभेचे आयोजन करण्यात आले होते.

हेही वाचा- लंडनच्या संसद चौकात ‘जय शिवराय’चा नारा

पंकजा मुंडे म्हणाल्या की, चिंचवडची पोटनिवडणूक ही बिनविरोध व्हावी अशी भाजपाची इच्छा होती. परंतु, विरोधी पक्ष निवडणुकीच्या रिंगणात उतरले. कोण जिंकेल हे जनता ठरवेल. पुढे त्या म्हणाल्या की, दिवंगत लक्ष्मण जगताप आणि मुक्ता टिळक हे मतदान करण्यासाठी गेले म्हणून भाजपा निर्दयी होत नाही. लोकशाहीत काही प्रोटोकॉल असे असतात ते पाळले नाहीत म्हणजे आपण निर्दयी आहोत असे नसते. अस म्हणत त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर निशाण साधला आहे. भाजपाचे जेष्ठ नेते गिरीश बापट यांच्या प्रश्नावर बोलताना त्या म्हणाल्या की, गिरीश बापट हे जेष्ठ नेते आहेत. त्यांचे आशीर्वाद मिळावेत म्हणून त्यांनी प्रचार केला असेल असे त्या म्हणाल्या आहेत.

हेही वाचा- “कसबा आणि चिंचवडमध्ये भाजपा पराभूत होणार, हे अमित शाहांनी हेरलं”, रोहित पवारांचा टोला!

पुढे त्या म्हणाल्या की, माझे सर्वांसोबत जवळचे आणि जिव्हाळ्याचे संबंध आहेत. सध्याचा काळ हा कसोशीचा आहे. एक कार्यकर्ता नेता होऊन पक्षाचे नेतृत्व करू शकतो हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दाखवून दिले आहे. पण, आगामी काळात त्यांचे आमदार निवडून आणण्याचे त्यांच्यासोबत आव्हान असेल. शिवसेना नाव नसताना पक्ष कसा उभा करायचा हा उद्धव ठाकरे यांच्यासमोर मोठा प्रश्न असेल, ते प्रश्नांची उत्तरे शोधतील आणि पुढे जातील. पुढे त्या म्हणाल्या की, आगामी काळात शिंदे आणि ठाकरे हा विषय कुतूहलाचा आहे. एकनाथ शिंदेंची शिवसेने आणि भाजपाची युती आहे. आमचे राज्यात सरकार आहे.