scorecardresearch

Premium

पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे काम बंद; पण पाइप ठेवण्याचे भाडे झाले साडेसात कोटी, जाणून घ्या काय आहे गौडबंगाल?

मागील साडेचार वर्षांतील पाइप ठेवण्याचे भाडे आणि सुरक्षारक्षकांसाठी सात कोटी ६८ लाख २४ हजार ५९७ खर्च जुन्या ठेकेदाराला दिला जाणार आहे.

Pavana closed water channel project
पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाचे काम बंद; पण पाइप ठेवण्याचे भाडे झाले साडेसात कोटी, जाणून घ्या काय आहे गौडबंगाल? (image – pixabay/representational image)

पिंपरी : पवना बंदिस्त जलवाहिनी प्रकल्पाच्या कामास गेल्या १२ वर्षांपासून स्थगिती होती. प्रकल्पासाठीचे लोखंडी पाइप व यंत्रसामग्री मावळ तालुक्यातील खासगी जागेत ठेवण्यात आले असून, त्यासाठी सुरक्षारक्षक नेमले आहेत. मागील साडेचार वर्षांतील पाइप ठेवण्याचे भाडे आणि सुरक्षारक्षकांसाठी सात कोटी ६८ लाख २४ हजार ५९७ खर्च जुन्या ठेकेदाराला दिला जाणार आहे.

हेही वाचा – पिंपरी : महापालिकेच्या नवीन थेरगाव, भोसरी रुग्णालयात ‘डीएनबी’ अभ्यासक्रम, राष्ट्रीय परीक्षा बोर्डाची मान्यता

Allegation of the farmers association of abuse of onion producers
कांदा उत्पादकांची कुचेष्टा केल्याचा शेतकरी संघटनेचा आरोप; निर्यातबंदी उठवल्याच्या अधिसूचनेची प्रतीक्षाच
20 kg of rice was demanded as a bribe from the farmer to keep power supply in Chandrapur
“अरेरे! आता हेच पाहायचं राहिलं होतं…” वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी शेतकऱ्याला लाचेत मागितले २० किलो तांदूळ
Posting objectionable content
‘सोशल मीडिया’वर आक्षेपार्ह मजकूर टाकणे सहायक फौजदाराला भोवले…
drinking water quality declined thane municipal corporation marathi news
ठाण्यात शुद्ध पाण्याच्या गुणवत्तेत घसरण पाणी गुणवत्ता प्रमाणात दोन टक्क्यांनी घट

हेही वाचा – पुणे : विधानसभेसाठी ठाकरे गटाची तयारी; ‘या’ चार माजी नगरसेवकांवर जबाबदारी

पवना धरण ते निगडीतील पेठ क्रमांक २३ येथील जलशुद्धीकरण केंद्रापर्यंत बंदिस्त जलवाहिनीद्वारे पाणी आणण्याचा प्रकल्प महापालिकेने २००८ मध्ये हाती घेतला होता. ठेकेदाराला ३० एप्रिल २००८ रोजी कार्यारंभ आदेश दिला होता. कामाची मुदत दोन वर्षे म्हणजे २९ एप्रिल २०१० पर्यंत होती. काम सुरू असताना जुन्या पुणे-मुंबई महामार्गावर प्रकल्पाच्या विरोधात झालेल्या रास्ता रोको आंदोलनात पोलीस गोळीबारात तीन शेतकऱ्यांचा मृत्यू झाला. तेव्हापासून काम बंद आहे. शासनाने नुकतीच प्रकल्पावरील स्थगिती उठविली आहे. आतापर्यंत केवळ १२.६२ टक्के काम झाले आहे. या कामास ३१ डिसेंबर २०२३ पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pavana closed water channel project work stopped but the rent for keeping the pipe was seven and a half crores pune print news ggy 03 ssb

First published on: 07-10-2023 at 12:32 IST

आजचा ई-पेपर : पुणे

वाचा
epaper image

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×