पिंपरी : संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यासोबत पंढरपूरपर्यंत पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या अग्निशामक दलाचे सात सदस्यीय प्रशिक्षित पथक तैनात असणार आहे. या पथकात अग्निशामक बंब, पाणी टँकर, प्राथमिक उपचार पेटी, बचाव साहित्य, जनरेटर याचा समावेश आहे.

संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे बुधवारी देहूतून प्रस्थान झाले. गुरुवारी पालखी आकुर्डीत मुक्कामी होती. शुक्रवारी पालखी पुण्यात दाखल होणार आहे. ‘सुरक्षित वारी, अखंड सेवा’ या भावनेने पिंपरी-चिंचवड महापालिकेचे अग्निशामक दलाचे पथक पालखीसमवेत २४ तास उपलब्ध असणार आहे. त्यासाठी सात सदस्यांचा विशेष प्रशिक्षित चमू नेमण्यात आला आहे. त्यामध्ये अनुभवी अग्निशामक अधिकारी, चालक व जवानांचा समावेश आहे. अग्निशामक बंब, पाणी टँकर, प्राथमिक उपचार पेटी, बचाव साहित्य, तसेच जनरेटर आणि विद्युत यंत्रणा उपलब्ध आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अग्निशामक दलाचा नियंत्रण कक्ष मदतीसाठी सज्ज ठेवण्यात आला आहे. वारीच्या मार्गावर कोणतीही घटना घडल्यास पिंपरी-चिंचवड अग्निशामक नियंत्रण कक्षाच्या ७७५७९६६०४९ या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन उपायुक्त मनोज लोणकर यांनी केले.