पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात घर, जमीन खरेदी करण्यास नागरिकांची पसंती मिळत असल्याचे दिसून आले आहे. पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ, मेट्रो प्रकल्प, दोन रिंगरोड असे महत्त्वाकांक्षी प्रकल्प, पुणे, पिंपरी-चिंचवड शहरांत असलेल्या पायाभूत सुविधा, शैक्षणिक केंद्र आणि जिल्ह्यातील औद्योगिक विस्तार यांमुळे पुणे, पिंपरी चिंचवड शहरात राहण्यास नागरिक प्राधान्य मिळत आहे. संपलेल्या आर्थिक वर्षात पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांमधून तब्बल ९१३० कोटी, तर ग्रामीण भागातून २१८७ कोटी असा पुणे जिल्ह्यातून ११ हजार ३१७ कोटी रुपयांचा महसूल शासनाच्या तिजोरीत जमा झाला आहे.

हेही वाचा >>> बसस्थानक परिसरात रिक्षा उभी करणाऱ्या १,६२० चालकांवर कारवाई, पीएमपी, आरटीओची मोहीम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाने संपलेल्या आर्थिक वर्षाच्या घेतलेल्या आढाव्यात ही बाब समोर आली आहे. राज्यभरातून नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाला ५० हजार ५०० कोटी रुपयांचा महसूल मिळाला आहे. त्यामध्ये एकट्या पुणे जिल्ह्याचा वाटा ११ हजार ३१७ कोटी रुपयांचा आहे. त्यामुळे राज्यात मुंबईनंतर सर्वाधिक महसूल देण्यात पुणे जिल्ह्याचा क्रमांक लागत असल्याचे या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे. पुण्यात गेल्या काही वर्षात आयटी, ऑटोमोबाइल हब, मेट्रो सिटी अशी नवीन ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे देशभरातील तरूणांकडून करिअरसाठी पुण्याला प्राधान्य मिळते. शैक्षणिक दृष्ट्या पायाभूत सुविधा, अनेक विद्यापीठ, शाळा-महाविद्यालये, रस्त्यांचे नेटवर्क, रेल्वे आणि महामार्गाचे विस्तारीकरण त्यामुळे एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात प्रवास करणे सोयीस्कर, मुबलक पाणी, चांगले हवामान आणि सुरक्षितता या कारणांमुळे पुण्यात स्थायिक होण्याला लोक पसंती देत असल्याचे स्पष्ट झाले आहे.