पिंपरी-चिंचवडमधून अपहरण केलेल्या व्यक्तीची पिंपरी- चिंचवड पोलिसांनी सुखरूप सुटका केली आहे. शेळ्यां- मेंढ्या विक्रीत मध्यस्थी करून ती व्यक्ती पैसे कमवायची. बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यात राहत असणाऱ्या ज्ञानेश्वर यादव रुपनर आणि त्याच्या इतर साथीदाराने तुकाराम शिंपले यांचे चिंचवडमधून अपहरण केलं होतं. अखेर त्यांची सुटका करण्यात पोलिसांना यश आल आहे.

हेही वाचा – मी छाती ठोकपणे सांगतो की, महादेव जानकर कुठेच जाणार नाही : चंद्रकांत पाटील

हेही वाचा – आमदार संग्राम थोपटे नक्की कोणासोबत ?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी- चिंचवडमध्ये वास्तव्यास असलेल्या तुकाराम शिंपले या व्यक्तीचं चिंचवडमधून अज्ञात व्यक्तींनी अपहरण केलं होतं. याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनला मिळाली होती. तुकाराम शिंपले हे शेळ्या-मेंढ्या खरेदी-विक्रीच्या व्यवसायात मध्यस्ती करून पैसे कमवायचे. मध्यस्थी करत असताना समोरच्या व्यक्तीने अनेक व्यवहारात पैसे न दिल्याने अनेकांचे देणेकरी ठरलेले तुकाराम शिंपले यांनी घर, दागिने आणि जमीन विकून काही जणांचे पैसे दिले. तर काहींचे पैसे देणे राहिले असल्याने ते काही महिन्यांपासून चिंचवडमध्ये पत्नीसह राहण्यास आले होते. दरम्यान, मेंढपाळ रघुनाथ नरुटे यांच्या शेळ्या-मेंढ्या विक्री व्यवहारांमध्ये तुकाराम शिंपले याने साडेचौदा लाख रुपये न दिल्याने तसेच त्याच्याकडे वारंवार पैसे मागूनही न दिल्याने रघुनाथ नरुटे याने त्याचा भाचा ज्ञानेश्वर यादव रुपनर, मित्र संदीप विक्रम नखाते, हंसराज सोळंके, नितीन जाधव यांनी चारचाकी गाडीतून तुकाराम शिंपले यांचं अपहरण केलं होतं. अखेर त्यांची बीड जिल्ह्यातील धारूर येथील काळ्याची वाडीतून सुखरूप सुटका करण्यात आली. तुकाराम शिंपले यांना एका बंद खोलीत डांबून ठेवण्यात आलं होतं. ही कारवाई गुन्हे शाखा युनिट दोनने केली आहे.