पुणे शहरातील ताडीवाला रस्ता परिसरातील सौरभ हॉलसमोरील रस्त्यावर झोपलेल्या व्यक्तीच्या अंगावरून चार चाकी वाहन गेल्याची घटना घडली आहे.या घटनेत त्या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
सरोज सुदर्शन बिश्वाल (वय ३५, रा. वडगाव शेरी ) असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ताडीवाला रस्ता परिसरातील सौरभ हॉलसमोरील रस्त्यावर सरोज बिश्वाल हाँ १२ मे रोजी झोपला होता. त्यावेळी भरधाव वेगाने आलेले चार चाकी वाहन सरोज बिश्वाल यांच्या अंगावरून गेले.यामध्ये सरोज बिश्वाल हे गंभीर जखमी झाले.त्यानंतर तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र त्याला डॉक्टरांनी मृत घोषित केले.तर आरोपी चालकाचा ताडीवाला रोड परिसरातील सीसीटीव्ही कॅमेरे च्या माध्यमांतून आरोपीचा शोध घेतला जात असल्याचे त्यांनी सांगितले.