पुणे : पेट्रोलियम कंपन्यांकडून विविध मागण्या मान्य होत नसल्याने पुण्यातील पेट्रोल पंपचालकांनी उद्यापासून (मंगळवार) बेमुदत बंद करण्याची घोषणा केली आहे. पेट्रोलियम कंपन्या इंधन वाहतुकीबाबत चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबवत असून, इंधन चोरीचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वारंवावर तक्रार करूनही पेट्रोलियम कंपन्या कार्यवाही करीत नसल्याने बंदचे पाऊल उचलण्यात आले आहे, अशी माहिती पेट्रोल डिलर्स असोसिएनने दिली आहे.

असोसिएशनच्या नुकत्याच झालेल्या बैठकीत १५ ऑक्टोबरपासून बेमुदत बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. याबाबत असोसिएशनचे अध्यक्ष ध्रुव रुपारेल म्हणाले की, इंधन वाहतुकीसाठी पेट्रोलियम कंपन्यांकडून चुकीच्या पद्धतीने निविदा प्रक्रिया राबविण्यात येत आहे. अव्यवहार्य दराने निविदा काढल्या जातात आणि वितरकांना कोरे कागद अथवा करारपत्रावर सही करायला भाग पाडले जाते. पेट्रोलियम कंपन्यांकडून वाहतुकीसाठी कमी दर स्वीकारणारे अनेक वाहतूकदार इंधन चोरीमध्ये गुंतलेले आहेत. त्यातील ६५ टक्के जणांना पोलिसांनी आधी पकडलेही होते. सर्व भागधारकांना विचारात न घेता पेट्रोलियम कंपन्या पावले उचलत आहेत. यामुळे इंधनाच्या सुरक्षित वाहतुकीला हरताळ फासला जात असून, सार्वजनिक सुरक्षेला धोका निर्माण होत आहे.

PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
Pimpri, Female computer operator bribe, computer operator bribe Female, bribe,
पिंपरी : सहाशे रुपयांची लाच घेताना संगणक चालक महिला अटकेत
western railway recovers 80 crore fine from ticketless passengers
विनातिकीट प्रवाशांकडून ८० कोटींची दंडवसुली; सात महिन्यांतील पश्चिम रेल्वेची कारवाई
Loksatta explained The quality of coal in power generation plants is deteriorating
विश्लेषण: वीजनिर्मिती प्रकल्पातील कोळशाचा दर्जा खालावतो आहे?
Pune Drunk drivers, proposal to suspend licenses,
पुणे : मद्यपी चालकांची ‘झिंग’ उतरणार, अडीच हजार जणांवर कारवाई; ५०० परवाने निलंबित करण्याचा प्रस्ताव
E-waste transportation, Navi Mumbai,
नव्या वर्षापासून ई-कचरा वाहतूक, ९०८ कोटींच्या कचरा संकलन कामाचाही प्रारंभ
41 lost mobile returned to complainant by pune police on the occasion of diwali
हरवलेले ४१ मोबाइल संच तक्रारदारांना परत; दिवाळीनिमित्त पोलिसांकडून अनोखी भेट

हेही वाचा >>> महिलांवरील अत्याचाराच्या घटनांचा निषेध, पुण्यात शरद पवार गटाकडून तीन तोंडी रावणाचे दहन

इंधन चोरी थांबविण्यासाठी पावले उचलण्याची मागणी असोसिएशनने वारंवार पेट्रोलियम कंपन्यांकडे केली होती. तरीही या दृष्टीने कोणत्याही उपाययोजना झालेल्या नाहीत. यामुळे गेल्या दोन वर्षांत इंधन चोरीच्या १० घटनांची नोंद झाली आहे. अशाच इंधन चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी एक महिन्यांपूर्वी मोक्का अंतर्गत कारवाई केली. पेट्रोलियम कंपन्यांकडून चोरी होऊ नये यासाठी मोठा खर्च करून अत्याधुनिक यंत्रणा बसविण्यात आली आहे. अधिकाऱ्यांकडून या यंत्रणेकडे दुर्लक्ष झाल्याने या चोऱ्या होत आहेत, असे रुपारेल यांनी सांगितले.

हेही वाचा >>> जेवणात मिरचीचा खर्डा न केल्याने महिलेवर चाकूने

पेट्रोल पंपचालकांच्या मागण्या

– इंधन वाहतुकीच्या सर्व निविदा त्वरित रद्द कराव्यात. 

– सुरक्षित वाहतुकीसाठी व्यवहार्य दरांसह नवीन निविदा काढाव्यात.

– सुरक्षेकडे दुर्लक्ष करणाऱ्या अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करावे.

– इंधन चोरीतील या अधिकाऱ्यांच्या सहभागाचीही पोलीस चौकशी व्हावी.

आम्ही बेमुदत बंदची सूचना पेट्रोलियम मंत्रालय, स्थानिक प्रशासन आणि पेट्रोलियम कंपन्यांना आधीच दिली आहे. त्यामुळे जनतेची गैरसोय टाळण्यासाठी १५ ऑक्टोबरपासून पेट्रोल आणि डिझेल पंपांवर योग्य प्रमाणात आणि वेळेवर पोहोचविण्याची जबाबदारी पेट्रोलियम कंपन्यांची असेल. – ध्रुव रुपारेल, अध्यक्ष, पेट्रोल डिलर्स असोसिएशन पुणे</p>