तीन लाख १३ हजार मतदारांचे छायाचित्र यादीत नाही, छायाचित्र नसल्यास नाव वगळण्याचा इशारा

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड महापालिकांच्या निवडणुका पुढील वर्षी फे ब्रुवारी महिन्यात होणे अपेक्षित आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक शाखेने मतदार यादी अद्ययावत करण्याची मोहीम हाती घेतली आहे. त्या अंतर्गत मतदार यादीत छायाचित्र नसलेल्या मतदारांची नावे संके तस्थळावर प्रसिद्ध करण्यात आली आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

त्यानुसार पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागातील एकू ण २१ विधानसभा मतदार संघांमधील तब्बल तीन लाख १३ हजार ९३९ मतदारांची छायाचित्रे मतदार यादीत नसल्याने संबंधित मतदारांनी त्यांचे छायाचित्र न दिल्यास त्यांचे नाव मतदार यादीतून वगळण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे हे मतदार महापालिका निवडणुकीतील मतदानाला मुकण्याची शक्यता आहे.

महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक शाखेकडून मतदार यादी अद्ययावत के ली जात आहे. संबंधित मतदारांनी तातडीने आपले छायाचित्र जमा करावे, असे आवाहनही करण्यात आले आहे. शहरातील वडगाव शेरी मतदार संघातील ६८ हजार ५६०, शिवाजीनगर २२ हजार ५०२, कोथरूड ४४ हजार ६७३, खडकवासला ३२ हजार १२३, पर्वती १९ हजार ५४१, हडपसर ४२ हजार ३३८, पुणे कॅ न्टोन्मेंट २५ हजार ९०३ आणि कसबा पेठ मतदार संघातील दहा हजार ८७४ अशा शहरातील एकू ण आठ मतदार संघांमध्ये दोन लाख ६६ हजार ५१४ मतदारांचे छायाचित्र मतदार यादीत नसल्याचे निवडणूक शाखेकडून सांगण्यात आले. पिंपरी-चिंचवडमधील चिंचवड मतदार संघातील ५७७०, पिंपरी ११ हजार १२९ आणि भोसरी मतदार संघातील १८३० अशा तीन मतदार संघातील  १८ हजार ७२९ मतदारांचे छायाचित्र अद्ययावत करण्यात आलेले नाही.

ग्रामीण भागातील जुन्नर विधानसभा मतदार संघातील शून्य, आंबेगाव नऊ, खेड-आळंदी शून्य, शिरूर ८९०२, दौंड ६३२०, इंदापूर ६९९६, बारामती शून्य, पुरंदर ४३३३, भोर ८८८ आणि मावळ मतदार संघातील १२४८ जणांचे छायाचित्र मतदार यादीत नाही.

छायाचित्र कु ठे जमा करायचे?

वडगाव शेरी – जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, तिसरा मजला

शिवाजीनगर – अन्नधान्य वितरण अधिकारी कार्यालय, अ-बरॅक, मध्यवर्ती शासकीय इमारत

कोथरूड – कर्वे रस्ता क्षेत्रीय कार्यालय

खडकवासला – हवेली तहसील कार्यालय, खडकमाळ आळी, शुक्रवार पेठ

पर्वती – बाबुराव सणस क्रीडांगण, सारस बागेजवळ

हडपसर – जिल्हा पुनर्वसन कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय किं वा हडपसर-मुंढवा, रामटेकडी-वानवडी, कोंढवा-येवलेवाडी क्षेत्रीय कार्यालय

पुणे कॅ न्टोन्मेंट – जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, तिसरा मजला

कसबा पेठ – जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, तिसरा मजला

पिंपरी – डॉ. हेडगेवार भवन, निगडी प्राधिकरण

भोसरी – जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, तिसरा मजला

चिंचवड – जिल्हाधिकारी कार्यालय, बी-विंग, तिसरा मजला

मतदार यादी पाहण्यासाठी संकेतस्थळ

मतदार यादीत नाव आहे किं वा कसे, हे   www.nvsp.in   या संके तस्थळावर समजेल.  मतदार यादीत छायाचित्र जोडता न आल्यास याच संके तस्थळावर अर्ज क्र. आठ भरावा, असे आवाहन निवडणूक शाखेकडून करण्यात आले आहे.

छायाचित्र नसलेल्या मतदारांच्या नावांची यादी   www.punenic.in    व   http://www.punecorporation.org    या संकेतस्थळांवर प्रसिद्ध करण्यात आली आहे. ३१ ऑगस्टपर्यंत संबंधित मतदारांनी आपली छायाचित्रे जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Photograph required in voter list zws
First published on: 20-08-2021 at 01:14 IST