पिंपरी- चिंचवड: मोठ्या उत्साहात गणपती बाप्पांच विसर्जन झालं. अनेक ठिकाणी डीजे विरहित मिरवणुका पार पडल्या. परंतु, काही ठिकाणी परवानगी न घेता गणपती विसर्जन मिरवणूक काढण्यात आली. डीजे चा कर्कश्य आवाजावर अनेक जण थिरकले. वाहतूक कोंडी केली. अशा गणेश मंडळावर सांगवी पोलिसांनी कारवाई केली आहे. गणेश मंडळाच्या सदस्यावर गुन्हा दाखल केला आहे. पोलीस हवालदार तुषार साळुंखे यांनी याबात तक्रार दिली आहे. बिपीन जयप्रकाश उपाध्याय अस गुन्हा दाखल झालेल्या ३७ वर्षीय व्यक्तीच नाव आहे.
पिंपळे सौदागरच्या मुख्य रस्तावर बिपीन यांनी कुठलीही परवानगी न घेता, पोलिसांना पूर्वकल्पना न देता, सार्वजनिक मिरवणुक काढण्यात आली. यामुळं रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी झाली. वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. विसर्जन मिरवणुकीदरम्यान मोठ्या कर्कश्य आवाजात डीजे लावण्यात आला होता. लाऊड स्पीकर लावण्यात आला होता. डीजे आणि कर्कश्य आवाजात डीजे वाजवू नये असं पोलिसांकडून आधीच सांगण्यात आलं होतं. या आदेशाचा भंग करून मिरवणूक काढली म्हणून अखेर बीएनएल कलम २२३ आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियम कलम १३६ अनव्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.