पिंपरी-चिंचवड शहरातील रहाटणी येथे पुणेकर ज्वेलर्सवर दरोडा टाकणाऱ्या सराईत गुन्हेगाराचा उत्तर प्रदेश येथे पोलिसांनी एन्काउंटर करत खात्मा केल्याचे समोर आले आहे.  वाकड पोलिसांनी याबाबत माहिती दिली आहे. रवींद्र उर्फ कालिया गोस्वामी (वय-२८ रा.आदमपूर, हिस्सार) असे एन्काउंटरमध्ये ठार झालेल्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या सराईत गुन्हेगाराने साथीदारांसह पिंपरी चिंचवडमधील रहाटणी येथे दरोडा टाकून तब्बल ९० लाख रुपयांचे ३ किलो सोन्याचे दागिने लंपास केले होते. दरोडा टाकणाऱ्या पैकी तो मुख्य सूत्रधार होता.  अनेक दिवसांपासून तो वाकड पोलिसांना हवा होता.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मार्च महिन्यात बंदूकधारी सहा जणांच्या टोळक्याने पिंपरी-चिंचवड शहरातील पुणेकर ज्वेलर्स या सराफी पेढीवर दरोडा टाकला होता. यात मालक दिव्यांक मेहता यांच्यावर गोळी झाडण्यात आली होती, त्यात ते गंभीर जखमी देखील झाले होते. त्यानंतर दुकानातील तीन किलो सोन्याचे दागिने आणि सीसीटीव्ही डीव्हीआर घेऊन पोबारा केला होता. घटनेनंतर वाकड पोलीस परराज्यात जाऊन आरोपीचा शोध घेत होते. मात्र, त्यांच्या हाती निराशाच येत होती. अखेरीस आज  त्यांना हवा असलेल्या मुख्य रवींद्रचा उत्तर प्रदेश पोलिसांनी मेरठ येथील दौराला येथे सरधान रोडवर  एन्काउंटर करत खात्मा केल्याची माहिती वाकड पोलिसांनी दिली.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad city robbery case main accused killed in encounter msr
First published on: 16-07-2019 at 21:16 IST