pimpri chinchwad, pimpri chinchwad defense problem, manohar parrikarिपपरी-चिंचवड शहरातील संरक्षण खात्याशी संबंधित प्रश्न सोडवण्यासाठी शहर भाजपच्या वतीने संरक्षणमंत्री मनोहर र्पीकर यांना पुन्हा साकडे घालण्यात आले आहे. या संदर्भात ठोस तोडगा काढू, असे आश्वासन र्पीकरांनी शिष्टमंडळाला दिले.

शहराध्यक्ष लक्ष्मण जगताप, माजी शहराध्यक्ष एकनाथ पवार, शिक्षण मंडळाचे माजी सभापती चेतन घुले, नगरसेवक शत्रुघ्न काटे, भाजपचे सरचिटणीस प्रमोद निसळ यांच्या शिष्टमंडळाने दिल्ली येथे र्पीकरांची भेट घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

बोपखेल ग्रामस्थांसाठी तातडीने रस्ता उपलब्ध करून द्यावा, िपपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, औंध-रावेत बीआरटी रस्त्यावर अडथळा ठरणाऱ्या उच्चदाब वीजवाहिन्या लष्कराच्या हद्दीत स्थलांतरित करण्यात याव्यात, आदी मागण्या  संरक्षणमंत्र्यांकडे करण्यात आल्या. तेव्हा या संदर्भात ठोस तोडगा काढू, असे आश्वासन र्पीकरांनी दिले.