scorecardresearch

Premium

पिंपरी-चिंचवडवर पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची नजर

कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे आणि वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांना मदत होणार आहे.

5000 cctv camera in pimpri chinchwad, pcmc 5000 cctv cameras, pcmc smart city, pimpri chinchwad municipal corporation
पिंपरी-चिंचवडवर पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेऱ्यांची नजर (संग्रहित छायाचित्र)

पिंपरी : स्मार्ट सिटी आणि महापालिकेच्या वतीने शहरामध्ये विविध ठिकाणी पाच हजार ‘सीसीटीव्ही’ कॅमेरे बसविण्यात आले आहेत. शहरातील दहा बीआरटी मार्गांवरही कॅमेरे बसविले आहेत. या कॅमेऱ्यांद्वारे गुन्हेगारांचा शोध घेणे आणि वाहतुकीचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईसाठी पोलिसांना मदत होणार आहे. वाहतुकीच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि वेगाची नोंद करण्याकरिता १६ ठिकाणी कॅमेरे बसविण्यात आले आहेत. वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनांचा क्रमांक आणि वेगाची नोंद या कॅमेऱ्यांद्वारे करण्यात येत आहे.

शहरातील वाहतूक कोंडी होणाऱ्या २३ ठिकाणीही कॅमेरे बसविण्यात आले आहे. त्याद्वारे वाहनांची माहिती संकलित करण्यात येत आहे. पिंपरी-चिंचवडमध्ये पहिल्यांदाच हा प्रयोग सुरू होणार असल्याचा दावा महापालिका प्रशासनाने केला आहे. वाहनांचे क्रमांक ओळखणारा ‘एएनपीआर’ कॅमेराही बसविण्यात आला आहे. त्याद्वारे निगडीतील केंद्रातून पोलीस या कॅमेऱ्याच्या मदतीने रस्त्यावर लक्ष ठेवून नियम मोडणाऱ्यांना दंड आकारणार आहेत. याने गुन्हेगारांची छायाचित्रे घेण्यात येणार आहेत. संबंधित गुन्हेगारांची माहिती त्या परिसरातील पोलीस कर्मचाऱ्यांना पाठविली जाणार आहे.

bharti university police arrest gang thieves robbery passengers abroad pune
रेल्वेत सोनसाखळी चोरणारी बंगाली टोळी अटकेत
dadar flower market
फुलांचा कचरा रस्त्यावर टाकणाऱ्या व्यापाऱ्यांवर दंडात्मक कारवाईचा इशारा
KDMT Bus Stop, kalyan dombivli bus stops, private vehicles parked at bus stop in kalyan dombivli
कल्याण-डोंबिवली परिवहन सेवेच्या बस थांब्यांना खासगी वाहनांचा विळखा
metro
ठाण्यात तीन डब्यांची मेट्रो; केंद्र सरकारची महापालिकेला सूचना

हेही वाचा : पिंपरी-चिंचवड शहराचा विकास कोणी केला? शरद पवार की अजित पवार? दोन्ही गटाचे शहराध्यक्ष म्हणाले…

प्रकल्पाला अडथळा करणाऱ्यांवर गुन्हे

स्मार्ट सिटी मार्फत सुरू असलेले अनेक प्रकल्प पूर्ण झाले. काही प्रकल्प प्रगतीपथावर आहेत. हे प्रकल्प शहराच्या नावलौकिकात भर घालणारे ठरतील मात्र, विकास प्रकल्प सुरू असताना अनेक समस्यांचा सामना प्रशासनाला करावा लागतो. त्यामुळे विकासात बाधा निर्माण होते. विकासाला अडथळा निर्माण करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या सूचना आयुक्त शेखर सिंह यांनी दिल्या आहेत.

Latest Comment
View All Comments
Post Comment

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Pimpri chinchwad municipal corporation install 5 thousand cctv cameras in the city to keep watch on traffic pune print news ggy 03 css

First published on: 26-09-2023 at 14:24 IST

संबंधित बातम्या

मराठी कथा ×