पिंपरी चिंचवडच्या महानगरपालिकेवर भाजपने एक हाती सत्ता आणल्यामुळे सर्वच विषय समित्यांवर भाजपचेच वर्चस्व राहिले. स्थायी समितीमध्ये १६ पैकी १० सदस्य हे भाजपचे आहेत.
पिंपरी चिंचवड महापालिकेच्या स्थायी समितीसह विविध विषय समितीच्या सदस्यांची निवड आज सर्वसाधारण सभेत झाली. स्थायी समितीमध्ये आपली वर्णी लागावी यासाठी नगसेवकांनी नेत्यांकडे साकडे घातले होते.
भाजपचे १०, राष्ट्रवादीचे ४, शिवसेना १, आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार स्थायी समितीत नियुक्त झाले आहेत. भाजपचे सर्वाधिक १० सदस्य निवडले असून भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेना स्थायी समिती सभापतीपदी कोणाची वर्णी लागेल हे पाहावे लागणार आहे.
पिंपरी चिंचवड महानगरपालिका स्थायी समिती सदस्य पुढीलप्रमाणे-
भाजप: १) लक्ष्मण उंडे २) कुंदन गायकवाड ३) उत्तम केंदळे ४) सिमा सावळे ५) उषा मुंढे
६) हर्षल ढोरे ७) निर्मला कुटे ८) कोमल मेवानी ९) माधुरी कुलकर्णी १०) आशा शेंडगे
राष्ट्रवादी: १) अनुराधा गोफणे २) वैशाली काळभोर ३) मोरेश्वर भोंडवे ४) राजू मिसाळ
शिवसेना: १) अमित गावडे
अपक्ष आघाडी: १) कैलास बारणे

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pimpri chinchwad municipality 2017 standing committee member selection
First published on: 23-03-2017 at 16:56 IST