पिंपरी : पिंपरी-चिंचवड पोलिसांनी एकाच महिन्यात ३५ सराईत गुन्हेगारांना पुणे जिल्ह्यातून तडीपार केले आहे. यामध्ये तीन महिलांचा समावेश आहे. जानेवारी ते जून या कालावधीत पोलिसांनी शहरातील १११ गुन्हेगारांना जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. याशिवाय विविध गुन्हे दाखल असलेल्या ३०० आरोपींच्या हालचालींवर पोलिसांनी बारकाईने लक्ष ठेवले आहे.आयुक्तालयाच्या परिमंडळ एकमधील चिंचवड, सांगवी, दापोडी, निगडी पोलीस ठाण्यातील १५ गुन्हेगारांना तडीपार केले आहे. त्यामध्ये चिंचवड पोलीस ठाण्यातील सद्दाम मोहम्मद तांबोळी, सोहेल मोहम्मद तांबोळी या दोन भावांसह लखन उर्फ कार्तिक कैलास साठे, स्वप्नील उर्फ आब्या संतोष भोसले, आदित्य बाबू आवळे, श्रीनाथ अंकुश वाघमारे या गुन्हेगारांना तडीपार केले आहे.

सांगवी पोलीस ठाण्यातील रोहित डॅनिअल तोरणे, अभय विकास सुरवसे, अक्षय दशरथ शिंदे, दापोडी ठाण्याच्या हद्दीतील मंगेश अशोक यादव, समीर जयवंत खैरनार, निगडीमधील सचिन उर्फ सुनील संतोष गायकवाड, अरमान उर्फ डायमंड मुन्ना खान, हृतिक अनिल जाधव तर प्रसाद उर्फ लंब्या लक्ष्मण सुतार या गुन्हेगारांना तडीपार केल्याचे पोलीस उपायुक्त संदीप आटोळे यांनी सांगितले.

परिमंडळ तीनमधील दिघी, म्हाळुंगे एमआयडीसी, चाकण, चिखली पोलीस ठाण्यातील २० सराईत गुन्हेगार तडीपार केले आहेत. दिघी पोलीस ठाण्यातील भरत अण्णासाहेब मुळे, आकाश सत्यवान तापकीर, प्रद्युम्न हिरामण पानसरे, प्रतीक नारायण पवार यांच्यासह रेखा हिरोत, प्रिया त्रिशूल कंजारभट या महिलांना तडीपार केले आहे.

म्हाळुंगे एमआयडीसी मधील रामदास मारुती साळुंखे, प्रभू शिवलिंग कोळी, दीपक शिवाजी खेंगले, चाकणमधील महेंद्र कैलास ससाणे, किरण फकिरा धनवटे, हनुमंत हरिभाऊ नायकोडी यांसह दर्शना राजू राठोड या महिलेला तडीपार केले आहे. चिखलीमधील अक्षय गुलाब जाधव, ऋषभ राहुल मांडके, घनश्याम सखाराम यादव, अफजल युसूफ मणियार, आळंदीमधील जितेंद्र हल्ले साहू, मोरंती उर्फ मोरवती चरणसिंग राजपूत, एमआयडीसी भोसरीमधील अजय अश्रुबा दुनघव या गुन्हेगारांना तडीपार केल्याची माहिती पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी दिली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कारवाई

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत पिंपरी-चिंचवड महापालिका, देहूरोड कटक मंडळ, चाकण, तळेगाव दाभाडे नगरपरिषद, हिंजवडी आयटी पार्क यासह अनेक ग्रामपंचायतींचा भाग येतो. आगामी महापालिका, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत निवडणुकांची तयारी निवडणूक विभागाने सुरू केली आहे. प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी प्रतिबंधात्मक कारवाई सुरू केली आहे.