पिंपरी- चिंचवड : शहरातील काही भागांमध्ये ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. आज दुपारी अचानक मुसळधार पावसाने शहरातील काही भागांमध्ये हजेरी लावली. आज सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. अखेर ढगांच्या गडगडाटासह दुपारी जोरदार पाऊस बरसला. पिंपरी- चिंचवडमध्ये अवघ्या एका तासामध्ये ११४ मिलिमीटर पाऊसाची नोंद झाली आहे.

पिंपरी- चिंचवड शहरातील काही भागांमध्ये दुपारी साडेतीन ते साडेचारच्या दरम्यान मुसळधार पाऊस झाला. यामध्ये पिंपरी, चिंचवड, आकुर्डी, चिखली आणि मोशी अशा काही परिसरामध्ये ढगफुटी सदृश्य पाऊस झाल्याने नागरिकांची धांदल उडाली. झोपडपट्टी परिसरातील अनेक घरात पाणी शिरले. यावर्षी पहिल्यांदाच ढगफुटी सदृश्य पावसाने हजेरी लावली.

आणखी वाचा-धक्कादायक! पुण्यातील हाॅटेलच्या बाथरूममध्ये अल्पवयीन मुलांचे ड्रग्स सेवन, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एका तासात तब्बल ११४ मिलिमीटर पाऊस झाल्याने अनेक ठिकाणी पाणी साचलं होतं. तसेच काही रस्त्यांवर गुडघ्या इतके पाणी पाहायला मिळालं. यामुळे शहरात महानगरपालिकेने नालेसफाई केले नसल्याचे बिंग फुटल्याचं बोललं जात आहे. नालेसफाई न झाल्याने काही भागांमध्ये घरात पाणी शरीराचाही बघायला मिळाले.