आयटी हब असलेल्या हिंजवडीमध्ये चार थायलंड तरुणींची वेश्याव्यवसायातून सुटका करण्यात आली आहे. ही कामगिरी अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने केली. या प्रकरणी परदेशी दलाल महिलेला हिंजवडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं आहे. जास्त पैशांचे अमिश दाखवून थायलंडच्या चारही तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता.

व्हॉट्सअॅपच्या माध्यमातून परदेशी दलाल महिला ही वेश्याव्यवसायाचे जाळे पसरवत होती. व्हॉट्सअॅपवर थायलंडच्या तरुणींचे फोटो पाठवून लोणावळा परिसरात व्हीला बुक करून तरुणींकडून वेश्याव्यवसाय करवून घेतला जात होता. अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध विभागाने बनावट ग्राहक पाठवून परदेशी दलाल महिलेचा भांडाफोड केला. बनावट ग्राहक पाठवून कासारसाई येथे सूर्य व्हीला येथे येण्यास सांगितले. महिलेने थायलंडच्या चार तरुणींना तिथे आणले. रात्री ११ च्या सुमारास पोलिसांनी छापा टाकून एजेंट महिलेला अटक करण्यात आली. महिलेकडून मोबाईल, इतर साहित्य. असा एकूण २० हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वेश्याव्यवसायाच्या जाळ्यातून चार थायलंडच्या तरुणींची सुटका पोलिसांनी केली आहे. अधिकचा तपास हिंजवडी पोलीस करत आहेत. ही कारवाई दिगंबर सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली करचुंडे, कारोटे, शिरसाट, बुचडे, जाधव यांच्या टीमने केली आहे.