पिंपरी-चिंचवड : पिस्तूल विक्रीसाठी आलेल्या व्यक्तीला सांगवी पोलिसांनी अटक केली आहे. आदित्य महेश डोंगरे यांच्याकडून तीन पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. सांगवी पोलिसांनी गेल्या चार दिवसांत चार पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे जप्त केल्याची कामगिरी केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जुन्या सांगवीतून दापोडी कडे जाणाऱ्या पुलावर आदित्य महेश डोंगरे पिस्तूल विक्रीसाठी आल्याची माहिती पोलीस हवालदार विवेक गायकवाड यांना मिळाली होती. घटनेची माहिती मिळताच विवेक गायकवाड हे पोलीस उपनिरीक्षक चक्रधर ताकभाते आणि इतर टीमसह त्या ठिकाणी पोहोचले. आदित्य डोंगरेला ताब्यात घेतले. त्याची पंचांसमक्ष झडती घेण्यात आली. त्याच्याकडे तीन देशी बनावटीची पिस्तूल आणि तीन जिवंत काडतुसे असा ७६ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हेही वाचा…गणेशोत्सवात ‘आव्वाज’ कमी! ध्वनिक्षेपक, ढोल-ताशा पथकांवर निर्बंध; डीजेवर बंदी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आदित्य हा पिस्तूल विक्रीसाठी आल्याचे स्पष्ट झाले आहे. परंतु, तो कोणाला पिस्तूल विकण्यासाठी आला होता, हे स्पष्ट झालेले नाही. याचा तपास करणं महत्त्वाचं आहे. त्यामुळे या घटनेचा सखोल तपास सांगवी पोलीस करत आहेत. आदित्य डोंगरे याच्यावर आर्म ऍक्टनुसार सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सांगवी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गेल्या चार दिवसांत चार पिस्तूल आणि चार जिवंत काडतुसे पोलिसांनी जप्त केली आहेत. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश बनसोडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.