पिंपरी : चिंचवडमधील वाल्हेकरवाडी परिसरात गुरुवारी (२६ जून) पाच जणांच्या टोळक्याने नऊ वाहनांची दगडाने तोडफोड केली. याप्रकरणी गिरीश शशिकांत लोंढे (वय १९, रा.वाल्हेकरवाडी) याला अटक केली आहे. तर, त्याच्या चार अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले. सहायक पोलीस आयुक्त सचिन हिरे यांनी ही माहिती दिली.

वाल्हेकरवाडीत नागरिकांनी घरासमोर वाहने उभी केली होती. रात्री अडीचच्या सुमारास पाच जणांचे एक टोळके वाल्हेकरवाडी परिसरात आले. आरोपींनी मद्यपान केले होते. मोठ्याने आरडाओरडा करत उभ्या केलेल्या वाहनांच्या काचा दगडाने फोडल्या. पाच मोटारी, तीन टेम्पो आणि एका रिक्षाची तोडफोड झाली आहे. गुंडविरोधी पथकासह गुन्हे शाखेच्या पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

‘सीसीटीव्ही’ फुटेजच्या आधारे आरोपींचा तीन तासात शोध घेतला. वाहनांची तोडफोड करण्याचे नेमके कारण समजू शकले नसल्याचे पोलिसांनी सांगितले.