पुणे : मार्केट यार्ड भागात पिस्तूल बाळगणाऱ्या गुंडाला पोलिसांनी पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली. सागर बबन पारिटे (वय ३५, रा. लोअर इंदिरानगर, बिबवेवाडी) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे.

हेही वाचा – पुणे : गणेशखिंड रस्त्यावर मालवाहू वाहनांना मनाई

हेही वाचा – पुणे : भाजपाच्या सत्ताकाळात भ्रष्टाचार शिगेला, अंदाजपत्रक विकण्याचाही प्रकार, रवींद्र धंगेकर यांचा हेमंत रासनेंवर आरोप

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

मार्केट यार्डातील फळभाजी बाजार परिसरात एक जण थांबला असून त्याच्याकडे पिस्तूल असल्याची माहिती मार्केट यार्ड पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आशिष यादव यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने पारिटेला सापळा लावून पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे एक पिस्तूल आणि पाच काडतुसे जप्त करण्यात आली. पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनघा देशपांडे, गुन्हे शाखेच्या निरीक्षक सविता ढमढेरे, सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक शिंदे, पराळे, दीपक मोधे, आशिष यादव, लोणकर आदींनी ही कारवाई केली.