पुणे : रक्षाबंधन सणानिमित्त पीएमपीच्या वतीने जादा गाड्यांचे नियोजन करण्यात आले आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड मधील प्रवाशांना त्याचा फायदा होणार असून रक्षाबंधनाच्या दिवशी १ हजार ८०९ गाड्या या दोन्ही शहरातील मार्गांवर उपलब्ध करून देण्यात येणार आहेत.

दरवर्षी रक्षाबंधन दिवशी मोठ्या संख्येने प्रवासी पीएमपीमधून प्रवास करतात. त्यासाठी दैनंदिन संचलनात असलेल्या १ हजार ७५५ गाड्यांव्यतिरिक्त ५४ गाड्या अशा एकूण १ हजार ८०९ गाड्या गुरुवारी (११ ऑगस्ट) पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात धावणार आहेत. या गाड्या मुख्यत्वे गर्दीच्या बसस्थानकावरून कात्रज, चिंचवड गांव, निगडी, सासवड, हडपसर, वरवंड, वाघोली, जेजुरी, आळंदी, तळेगांव, भोसरी, रांजणगांव,राजगुरूनगर आणि देहूगांव आदी ठिकाणी सोडण्यात येणार आहेत. जादा गाड्या सोडण्यात येणार असल्याने वाहक, चालक, पर्यवेक्षकीय सेवकांच्या साप्ताहिक सुट्ट्या रद्द करण्यात आल्या आहेत. पुणे आणि पिंपरी-चिंचवडमधील महत्त्वाच्या स्थानकांवर बस संचलन नियंत्रणासाठी अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. प्रवाशांच्या मदतीसाठी महत्वाच्या स्थानकांवर आणि बसथांब्यावर प्रवाशांना मार्गदर्शन आणि वाहतूक नियंत्रणासाठी अन्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवरही जबाबदारी देण्यात आली आहे, अशी माहिती पीएमपीच्या वाहतूक विभागाकडून देण्यात आली.

HC orders Mumbai Municipal Corporation to devise alternative policy for unlicensed hawkers
विनापरवाना फेरीवाल्यांसाठी पर्यायी धोरण आखा, उच्च न्यायालयाचे मुंबई महानगरपालिकेला आदेश
Planning of extra bus service by state transport due to holidays
नाशिक : सुट्यांमुळे राज्य परिवहनतर्फे जादा बससेवेचे नियोजन
Mumbai new road
मुंबई : रस्त्यांच्या कॉंक्रिटीकरणाच्या नवीन कामांसाठी १५ कंत्राटदारांचा प्रतिसाद
houses in Worli BDD
वरळी बीडीडीतील अंदाजे ५५० घरांचा ताबा वर्षाखेरीस, ३३ पैकी १२ इमारतींची कामे सुरु