वाहन चालविण्याचा शिकाऊ किंवा पक्का परवाना काढण्याच्या प्रक्रियेत आता वाहतूक पालनाच्या शपथेचाही समावेश करण्यात आला आहे. ही शपथ घेतल्यानंतरच परवाना मिळणार आहे. पुणे प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून शनिवारपासून त्याची अंमलबजावणी सुरू करण्यात आली आहे.
राज्याच्या परिवहन कार्यालयाकडून सर्व आरटीओ कार्यालयांना याबाबतचे आदेश देण्यात आले आहेत. वाहन परवाना काढणाऱ्यांना वाहतूक नियमांची माहिती व्हावी आणि वाहतुकीच्या नियमांबाबत जनजागृतीच्या दृष्टीने परवान्याच्या प्रक्रियेत शपथेचा समावेश करण्यात आला आहे.
पब्लिक कन्सर्न फॉर गव्हर्नन्स ट्रस्ट (पीसीजीटी) या संस्थेने मराठी आणि इंग्रजीत शपथेचा नमुना तयार केला आहे. परवाना मागणाऱ्याला ही शपथ घ्यावी लागणार असून, शपथेच्या नमुन्यावर स्वाक्षरीही करावी लागणार आहे.
