पुणे : पुणे मेट्रोचे रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मार्गाचे काम पूर्ण झाले आहे. या मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते १९ फेब्रुवारीला करण्याचे नियोजन होते. प्रत्यक्षात मोदींचा दौरा लांबणीवर पडला असल्याने उद्घाटनाचा मुहूर्तही पुढे ढकलावा लागला आहे. त्यामुळे रामवाडीपर्यंत मेट्रोने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना आणखी काही काळ वाट पाहावी लागणार आहे.

मेट्रोची विस्तारित सेवा गेल्या वर्षी १ ऑगस्टला सुरू झाली. वनाज ते रुबी हॉल हा ९.७ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी या मार्गावर वनाज ते गरवारे स्थानकापर्यंत सेवा सुरू होती. नंतर गरवारे ते रुबी हॉल स्थानकापर्यंत सेवेचा विस्तार झाला. याच वेळी पिंपरी-चिंचवड महापालिका ते जिल्हा न्यायालय हा १३.९ किलोमीटरचा मार्ग सुरू झाला. आधी पिंपरी-चिंचवड महापालिका ते फुगेवाडी हा मार्ग होता. नंतर हा मार्ग फुगेवाडीपासून जिल्हा न्यायालयापर्यंत विस्तारला. आता वनाज ते रुबी हॉल मार्ग आता रामवाडीपर्यंत विस्तारण्यात आला आहे. या मार्गाचे काम पूर्ण झाले असून, त्याची अंतिम तपासणीही केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्तांनी केली आहे. त्यामुळे या मेट्रोच्या मार्गाच्या उद्घाटनाची औपचारिकता केवळ शिल्लक आहे. या विस्तारित मार्गाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्याचे नियोजन आखण्यात आले होते.

retired employees of KEM
केईएममधील सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांचे ठिय्या आंदोलन
heavy traffic in patri pool area in kalyan
कल्याण : पत्रीपुलामुळे पुन्हा मनस्ताप, आता रस्ते कामामुळे अभूतपूर्व वाहतूक कोंडी
Pune, Metro Line, Extensions, PMRDA, Mahametro, Clash, Project Responsibility,
पुण्यातील मेट्रोच्या विस्तारित मार्गांचे गाडे अडले; काम कोण करणार यावरून तिढा
Mumbai E auction shops
मुंबई : १७३ दुकानांचा ५ एप्रिल रोजी ई-लिलाव, नोंदणी, अर्ज भरण्याच्या प्रक्रियेस १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ

हेही वाचा…पुणे विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं उद्घाटन का नाही? आदित्य ठाकरेंनी सांगितलं कारण…

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पंतप्रधान मोदी १९ फेब्रुवारीपासून उत्तर प्रदेशच्या दौऱ्यावर आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मोदींच्या हस्ते अनेक विकासकामांची पायाभरणी या दौऱ्यात होईल. यानंतर मोदी गुजरातच्या दौऱ्यावर जाणार आहेत. यामुळे मोदींचा पुणे दौरा लांबणीवर पडला असून, मेट्रोच्या उद्घाटनाची मुहूर्तही हुकणार आहे.

अद्याप हिरवा कंदील नाही

रुबी हॉल ते रामवाडी या विस्तारित मेट्रो मार्गाची अंतिम तपासणी केंद्रीय मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त जनककुमार गर्ग यांनी १९ ते २१ जानेवारी या कालावधीत केली. या तपासणीदरम्यान त्यांनी या मार्गातील काही त्रुटी उपस्थित केल्या. या त्रुटी दूर करून महामेट्रोने त्याचा अहवाल आयुक्तांना पाठविला. त्यानंतर या मार्गाला अंतिम मंजुरी मिळण्याचा मार्ग खुला झाला. मात्र, अद्याप आयुक्तांनी या मार्गाला हिरवा कंदील दिलेला नाही, अशी माहिती महामेट्रोतील सूत्रांनी दिली.

हेही वाचा…प्रत्येक भटक्या कुत्र्यावर पुणे महापालिका करणार ४५० रुपये खर्च! जाणून घ्या योजना…

रुबी हॉल ते रामवाडी मेट्रो मार्ग

अंतर – ५.५ किलोमीटर

स्थानके – बंडगार्डन, येरवडा, कल्याणीनगर, रामवाडी