scorecardresearch

पंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरी यांची भेट

प्रकृतीबाबत विचारपूस करून पंतप्रधान दिल्लीकडे रवाना

पंतप्रधान मोदींनी घेतली अरूण शौरी यांची भेट

पोलीस महासंचालकांच्या परिषदेसाठी पुणे दौऱ्यावर आले होते. परिषदेच्या समारोपानंतर पंतप्रधान मोदी यांनी आज(रविवार) रूबी रूग्णालयात जाऊन माजी मंत्री आणि जेष्ठ पत्रकार अरूण शौरी यांची भेट घेतली. यावेळी मोदींनी शौरी यांच्या तब्यतीची विचारपूस केली व त्यानंतर ते दिल्लीकडे रवाना झाले.

अरूण शौरी यांना १ डिसेंबर रोजी रूबी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. अंगणात फेरफटका मारताना भोवळ येऊन पडल्याने शौरी यांच्या डोक्याला मार लागला होता. तेव्हापासून ते रुग्णालयातच आहेत, त्यांच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

देशभरातील पोलीस महासंचालकांच्या राष्ट्रीय पातळीवरील सुरक्षा परिषदेचा प्रारंभ शुक्रवारी झाला होता. परिषदेचे मुख्य सूत्र न्यायवैद्यकीय तपास आणि शास्त्रीय तपास असे होते. देशांतर्गत सुरक्षेवरही परिषदेत चर्चा केली गेली. पंतप्रधान मोदी यांच्यासह केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मार्गदर्शन केले.

केंद्रीय गृह राज्यमंत्री जी.किशन रेड्डी यांनी या परिषदेच्या समारोपानंतर माध्यमांशी, बोलताना देशातील सर्व राज्यातील पोलीस दलाचे सक्षमीकरण करण्यावर, केंद्र सरकार लक्ष देत आहे. त्यासाठी केंद्र सरकार कुठल्याही प्रकारचा निधी कमी पडू देणार नाही, असे सांगितले. याचबरोबर पुण्यात देशातील पोलीस महासंचालकांची परिषद यशस्वी झाली असल्याचेही त्यांनी सांगितले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या