महापालिकेच्या शाळांतील लाखभर विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक भवितव्याच्या दृष्टीने निर्णय घेणाऱ्या शिक्षण समितीच्या सदस्यांची पात्रता मात्र दहावी उत्तीर्ण अशी राहणार आहे. नव्याने स्थापन होणाऱ्या शिक्षण समितीमध्ये आपल्या पक्षातील कार्यकर्त्यांची वर्णी लागावी यासाठीच हा सारा आटापिटा करण्यात आला आहे. सातवी, दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण सदस्य महापालिकेच्या शाळांतील लाखभर विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे यासंबंधीचे निर्णय घेणार आहेत. त्यांच्या हाती विद्यार्थ्यांचे शैक्षिणक भवितव्य राहणार असल्याचेही स्पष्ट झाले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

राज्य शासनाने १ जुलै २०१३ मध्ये नगरपरिषदा आणि महापालिकांची शिक्षण मंडळे बरखास्त करण्याचा निर्णय घेतला. सर्व शिक्षण मंडळांचे महापालिकेत विलीनीकरण होईल आणि महापालिकेतील अन्य समित्यांप्रमाणेच शिक्षण समितीची स्थापना करून त्याचे कामकाज करण्यात येईल, असे राज्य शासनाकडून जाहीर करण्यात आले होते. त्यानुसार काहीशा विलंबाने का होईना शिक्षण समितीच्या रचनेचे प्रारूप तयार करण्यात आले होते. हे प्रारूप मंत्रिमंडळाच्या बैठकीपुढे ठेवण्यात आले असून येत्या काही दिवसांमध्ये या प्रारूपाला मान्यता मिळण्याची शक्यता आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc education committee
First published on: 23-11-2017 at 04:00 IST