पुणे महानगर पालिकेचे सन २०२०-२०२१ या आर्थिक वर्षाचे ६ हजार २२९ कोटी रुपयांचे अंदाजपत्रक महापालिका आयुक्त शेखर गायकवाड यांनी सोमवारी स्थायी समिती सदस्यांसमोर सादर केले. यामध्ये मिळकतकरात ११ टक्के, तर पाणीपट्टीत १५ टक्क्यांनी वाढ सुचविण्यात आली आहे. यावेळी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे, अतिरिक्त आयुक्त रुबल अग्रवाल आदी उपस्थित होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

या अंदाजपत्रकात स्थायी समिती अध्यक्ष हेमंत रासने नव्या योजनांचा समावेश करून येत्या काळात मुख्य अंदाजपत्रक सादर करतील, त्यामुळे अंदाजपत्रकाचा आकडा आणखी किती वाढणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.

सन २०२०-२०२१ च्या अंदाजपत्रकातील महत्वाचे मुद्दे :

  • पाणी पुरवठा १२०० कोटी, घनकचरा ४५० कोटी, वाहतूक सुधारणा आणि रस्त्यांसाठी ६६४ कोटींची तरतूद
  • कचरा व्यवस्थापनासाठी ५८५ कोटींची विशेष तरतूद
  • जायका प्रकल्पासाठी ७५ कोटींची विशेष तरतूद
  • महापालिकेचे जुने प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्राधान्य दिले जाणार
  • भूजलसाठा वाढविण्यावर भर दिला जाणार
  • शहरातील दुचाकींची वाढती संख्या लक्षात घेता ‘फ्री वे’ विचाराधीन
  • मोकळ्या शासकीय जागांचा पार्किंगसाठी वापर करण्याची योजना
  • सार्वजनिक वाहतुकीच्या सक्षमीकरणासाठी नव्याने आठ ते दहा मेट्रो मार्गांचा विचार
  • शहरालगत सायकल ट्रक विकसित केले जाणार
  • सरकारी कार्यालयाच्या जागेत चार्जिंग सेंटर उभारणार
  • बालगंधर्व रंगमंदिराचा पुर्नविकास करणार
  • महापालिकेत समाविष्ट झालेल्या ११ गावाची माहिती ‘जीआयएस’ प्रणालीवर उपलब्ध करणार
  • रेन वॉटर हार्वेस्टिंगचे अनुदान कमी करणार
  • महापालिकेच्या संगणक प्रणालीचे ऑडिट करण्यात येणार
  • मिळकतकर थकबाकी वसुलीसाठी अभय योजना विचाराधीन
  • शहरात विशेष मुलांच्या शिक्षणासाठी शाळा उभारल्या जाणार
  • महापालिकेच्या सर्व शाळांमध्ये सीसीटीव्ही बसवणार
  • पुणे महापालिकेच्या आयटीआय विद्यालयांमध्ये कौशल्य विकास कोर्स राबविणार
  • सार्वजनिक ठिकाणी महिलांच्या सुरक्षेसाठी सेफ्टी ऑडिट आणि सेफ्टी मॅपिंग करण्यात येणार
  • पंतप्रधान आवास योजनेंतर्गत शहरात १० हजार घरं उभारणार
  • नैसर्गिक आपत्ती आणि अपघातग्रस्तांना तातडीच्या खर्चासाठी १.५० कोटी रूपयांची तरतूद
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmc income tax would be increase by 11 percent and water tax by 15 percent aau 85 svk
First published on: 27-01-2020 at 15:17 IST