पीएमपीने भाडेकरारावर चालविण्यास दिलेल्या १५० मध्यम आकाराच्या (मिडी बस) गाड्यांचा करार रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला आहे. पीएमपीकडून या सर्व गाड्यांचे आता संचलन होणार आहे. पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी त्याबाबतचे आदेश दिले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>>राज्यातील महापालिकांमध्ये बेकायदा खासगी सुरक्षारक्षक; जिल्हा सुरक्षारक्षक मंडळाकडून पुणे महापलिकेविरूद्ध पाच खटले

पीएमपीने ११७ मिडी बस आणि महिलांसाठीच्या ३३ तेजस्विनी गाड्यांसाठी देखभाल दुरुस्तीसाठी एका खासगी कंपनीबरोबर करार केला होता. या करारानुसार प्रती किलोमीटर अंतरासाठी ४२.९९ रुपये दर निश्चित करण्यात आला होता. पीएमपीच्या मालकीच्या गाड्या ठेकेदाराला भाडेकराराने चालविण्यास देण्याच्या निर्णयाचे तीव्र पडसादही उमटले होते. प्रवासी संघटनांनी या निर्णयाला विरोध दर्शविला होता.

हेही वाचा >>>पुणे: राज्यातील तापमानाचा पारा आणखी खाली उतरणार

या दरम्यान, भाडेकराराने ठेकेदाराला चालविण्यासाठी देण्यात आलेल्या गाड्यांचा आढावा पीएमपीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक ओमप्रकाश बकोरिया यांनी घेतला. त्या वेळी ठेकेदार कंपनीकडून सेवा देणे आर्थिकदृष्ट्या परवडत नसल्याचे या बैठकीत सांगितले. त्यानंतर पीएमपी प्रशासनाने हा करार रद्द करण्याचा निर्णय घेतला. या सर्व गाड्यांचे संचलन आता पीएमपीकडून होणार आहेत. ओमप्रकाश बकोरिया यांनी तसे आदेश वाहतूक व्यवस्थापन विभागाला दिले आहेत.

पीएमपीच्या ताफ्यात एकूण २,१४२ गाड्या आहेत. यातील १,१३० गाड्या ठेकेदाराच्या, तर १,०१२ गाड्या पीएमपीच्या मालकीच्या आहेत. पीएमपीच्या ताफ्यात १५० गाड्या आल्याने ही संख्या वाढली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pmp will take back midi bus given on lease pune print news apk 13 amy
First published on: 26-12-2022 at 10:31 IST