पुणे : कामावरून घरी निघालेल्या ‘पीएमपीएमएल’ चालकाची डोक्यात दगड घालून हत्या!

हांडेवाडी येथील एका मोकळ्या जागेत आढळला मृतदेह

Hooligan on a police record was stabbed to death
पूर्ववैमनस्यातून हत्या करण्यात आली असावी, असा पोलिसांचा अंदाज आहे. (संग्रहीत छायाचित्र)

पुण्यात स्वारगेट डेपो मधील पीएमपीएमएल चालक कामावरून घरी जात असताना, त्यांना रस्त्यामध्ये अडवून डोक्यात दगड घालून त्यांची हत्या करण्यात आल्याची खळबळजनक घटना घडली आहे. गौतम मच्छिंद्र साळुंखे (वय २९ रा. ढमाळवाडी, फुरसुंगी) असे हत्या झालेल्या पीएमपीएमएल चालकाचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार, गौतम मच्छिंद्र साळुंखे हे पीएमपीएमएल मध्ये चालक म्हणून जवळपास अडीच वर्षापासून काम करत होते. गौतम यांची स्वारगेट डेपोत ड्युटी असल्याने, स्वारगेट ते धायरी या मार्गावर ते काम करीत असत. नेहमीप्रमाणे गौतम साळुंखे हे दुपारी कामावर आले आणि रात्री पावणे दहा वाजेच्या सुमारास काम संपल्यावर घरी निघून गेले. मात्र सकाळ झाली तरी गौतम साळुंखे हे घरी न आल्याने, त्यांच्या सासऱ्यांनी स्वारगेट डेपोत जाऊन चौकशी केली. त्यावर ते काम संपवून, रात्रीच घरी गेल्याचे सांगण्यात आले. त्यानंतर घरच्यांनी शोधाशोध घेण्यास सुरुवात केली. त्याच दरम्यान आम्हाला नियंत्रण कक्षावर माहिती मिळाली की, हांडेवाडी येथील एका मोकळ्या जागेत मृतदेह आढळून आला आहे. त्यानुसार आम्ही घटनास्थळी जाऊन पाहिले असता. त्या मृतदेहाचा चेहरा ओळखू येत नव्हता. बाजूला दगड पडला होता. दगड चेहर्‍यावर घालूनच हत्या केल्याचे दिसून आले.

मृतदेहावरील कपडे आणि कागदपत्रांच्या सहाय्याने गौतम साळुंखे यांचा मृतदेह असल्याचे स्पष्ट झाले. कोणत्या कारणासाठी गौतम साळुंखे यांची हत्या झाली आहे. हे अद्यापपर्यंत समजू शकले नसून याबाबतचा तपास सुरू असल्याचे लोणी काळभोर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोकाशी यांनी सांगितले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व पुणे बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Pmpml driver brutally murdered in pune msr 87 svk

Next Story
मेट्रोचे स्टेशन कोथरूडच्या कचरा डेपोच्या जागीच होणार