पुणे : अतिवृष्टीसह उद्धभवणाऱ्या अन्य आपत्कालीन परिस्थितीचा सामना करण्यासाठी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाचा (पीएमआरडीए) आपत्कालीन विभाग अत्याधुनिक यंत्रणेसह सज्ज झाला आहे. आपत्तीच्या काळात वेळेवर मदत पोहोचविण्याच्या दृष्टीने नियोजन करण्याचे आदेश पीएमआरडीचे सह महानगर आयुक्त दीपक सिंगला यांनी दिले आहेत. दरम्यान, आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांनी घराबाहेर पडू नये तसेच धोकादायक ठिकाणी जाऊ नये, असे आवाहनही पीएमआरडीए प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
हवामान विभागाकडून सातत्याने पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. त्यानुसार काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर सिंगला यांनी सर्व यंत्रणेला सतर्कतेचे आदेश दिले आहेत. आपत्कालीन परिस्थितीमध्ये तातडीने मदतकार्य पोहोचविण्याच्या दृष्टीने नियोजनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
मदतीसाठी संपर्क क्रमांक
पुणे आपत्ती प्रतिसाद पथक (पीडीआरएफ)- ९५४५२८२९३०
मारूंजी अग्निशमन विभाग- ०२०- ६७९९२१०१, ६७९९२१००, ७०६६०५५१०१
नांदेड सिटी अग्निशमन विभाग- ०२०- ६७५२०००२, ६७५२२०००१
वाघोली अग्निशमन विभाग- ०२०- २९५१८०१, २९५१९१०१