गेल्या आठवड्यात ४ पिस्तुले आणि ८ जिवंत काडतुसे केली होती जप्त

पिंपरी- चिंचवड: बाबा शेख गॅंगचा सदस्य आणि तडीपार गुंड पवन देवेंद्र बनेटीला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे गुन्हे शाखा युनिट चार ने जप्त केले आहेत.

बाबा शेख गॅंग चा सदस्य पवन बनेटी ला अखेर अटक करण्यात आली आहे. त्याला पुणे जिल्ह्यातून दोन वर्षांकरिता तडीपार करण्यात आलेलं आहे. मोक्का जेल रिलीज आरोपी आहे. पिंपळे गुरवमधील राजीवगांधी परिसरात राहणाऱ्या पवन बनेटीला पिंपळे निलख परिसरातून अटक करण्यात आली आहे.

त्याच्याकडून २ पिस्तुले आणि २ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याप्रकरणी सांगवी पोलीस ठाण्यात आर्म ऍक्टनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलीस निरीक्षक अरविंद पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली आहे.

गेल्या आठवड्यात ही पिस्तुले आणि जिवंतकाडतुसे जप्त

गेल्या आठवड्यात गुन्हे शाखा युनिट चार ने चार पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे जप्त केली होती. चिखली परिसरातून तिघांना अटक करण्यात आली होती. चार पिस्तुले आणि आठ जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत.