पुणे : शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारातून आरोपीने पसार होण्याचा प्रयत्न पोलिसांनी उधळून लावला. पोलिसांनी वीस फूट उंचीवरुन उडी मारुन पसार होण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला पकडले. दीपक शिवाजी जाधव (वय २८, रा. कात्रज) असे आरोपीचे नाव आहे. पोलीस हवालदार सचिन शिंदे यांनी याबाबत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे : दुहेरीकरणामुळे अनेक रेल्वे गाड्या रद्द ; काही गाड्यांच्या वेळापत्रकात बदल 

vasai leopart marathi news, vasai fort leopard marathi news
वसई : बिबट्याच्या दहशतीचा परिणाम, रोरोच्या संध्याकाळच्या शेवटच्या दोन फेऱ्या रद्द
boy tied to tree, boy beaten Temghar Pada,
ठाणे : १० वर्षीय मुलाला पेरूच्या झाडाला बांधून मारहाण, आरोपींविरोधात गुन्हा दाखल
Death of two brothers
पाण्याच्या टाकीत पडून दोन भावांचा मृत्यू: दाम्पत्यावर दुःखाचा डोंगर कोसळला असताना लगेचच झोपडीवरही कारवाई, न्यायालयाने घेतली दखल
Forest department staff succeeded in imprisoning a leopard that fell into a well
Video : बिबट्याची दोनदा हुलकावणी अन् जेरबंद करण्याचा थरार

न्यायालयाने जाधव याच्या विरुद्ध वाॅरंट बजावले होते. वॉरंट रद्द करण्यासाठी जाधव न्यायालयात आला होता. न्यायालयाने त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले. न्यायालयात सुनावणी सुरू असताना जाधव न्यायालयीन कक्षातून पळाला आणि वीस फूट उंचीवरुन उडी मारली. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांनी त्याला पाठलाग करुन ताब्यात घेतले. न्यायालयाने जाधव याला न्यायालयीन कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले. जाधव याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात अली आहे.