पिंपरी- चिंचवड: राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळवून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून गेल्या दोन अडीच तासांपासून राजेंद्र हगवणे यांचा मित्र सुनील चांदेरे यांची पोलीस उपायुक्त विशाल गायकवाड आणि गुंडा विरोधी पथकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हरीश माने हे चौकशी करत आहेत. राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळवून जाण्यास मदत केल्याचा संशय पोलिसांना आहे.
वैष्णवी आत्महत्या प्रकरणी अद्यापही राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा सुशील हगवणे याला अटक झालेले नाही. पोलिसांची सहा पथक दोघांचा शोध घेत आहेत. दरम्यान, राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणे यांना पळवून जाण्यास मदत केल्याच्या संशयावरून गेल्या अडीच तासांपासून सुनील चांदिरे नावाच्या व्यक्तीची कसून पोलीस चौकशी सुरू आहे. सुनील चांदिरे हे राजेंद्र हगवणे यांचे मित्र आहेत. त्यामुळे त्यांनी पळून जाण्यास आणि ते कुठे आहेत. याबाबत त्यांना माहिती असण्याची शक्यता पोलीस सूत्रांनी वर्तवली आहे. सुनील चांदिरे यांच्याकडून राजेंद्र हगवणे आणि त्यांचा मुलगा कुठे आहे. याबाबत सुगावा लागण्याची शक्यता आहे. त्या दिशेने पिंपरी -चिंचवड पोलीस तपास करत आहेत. काही तासात आरोपी जेरबंद असतील असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.