Premium

पुणे: गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित करणं पडलं महागात;  तिघांवर गुन्हा दाखल

चाकणमधील मोई येथे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता.

police registered case against three for organizing gautami patil show
गौतमी पाटीलचा कार्यक्रम

प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलचा कार्यक्रम आयोजित केल्यामुळे आयोजकांवर गुन्हा दाखल झाला आहे. चाकणमधील मोई येथे विद्यमान आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलच्या नृत्याचा कार्यक्रम आयोजित केला होता. या कार्यक्रमाला महाळुंगे पोलिसांनी परवानगी नाकारली, तरीदेखील आयोजकांनी गौतमी पाटीलचा जाहीर कार्यक्रम घेतल्याने आता गुन्हा दाखल झाला आहे. समीर रामदास गवारे, आनंद चिंतामण गवारे आणि विश्वनाथ शांताराम गवारे अशी गुन्हा दाखल झालेल्या आयोजकांची नावे आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

हेही वाचा >>> पुणे, खडकी कटक मंडळांचे पुणे महापालिकेमध्ये कसे होणार विलीनीकरण? जाणून घ्या…

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Police registered case against three for organizing gautami patil show zws 70 kjp