खडकवासला धरणातून मुठा नदी पात्रामध्ये संध्याकाळी सात वाजल्यापासून ८१३२ क्यूसेकने विसर्ग सुरू करण्यात आलेला असून धरण क्षेत्रामध्ये पावसाच्या प्रमाणात वाढ झालेली असून येत्या ३-४ तासांमध्ये धरणातून अंदाजे १५,००० ते १८,००० क्यूसेकने विसर्ग सुरू करण्याची दाट शक्यता आहे. धरण परिसरात पावसाचे प्रमाण पाहून विसर्ग कमी-जास्त होऊ शकतो. -यो.स.भंडलकर,सहाय्यक अभियंता, खडकवासला, पानशेत व वरसगाव प्रकल्प