पुणे महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवी पर्यंतच्या शाळा १५ डिसेंबरपर्यंत बंद राहणार आहेत. पुणे महापालिका अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे यांनी ही परिपत्रकाद्वारे माहिती दिली आहे. त्यामुळे राज्यभरात उद्या (१ डिसेंबर)पासून पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू होणार असल्या, तरी मुंबई, नाशिक पाठोपाठ आता पुण्यातही या वर्गांच्या शाळा सुरू होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे. पुणे महापालिकेच्यावतीने करोना विषाणू संसर्ग साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन अंतर्गत सुधारित मार्गदर्शक सूचना आज जारी करण्यात आल्या आहेत.

एक डिसेंबरपासून इयत्ता पहिलीपासूनचे वर्ग सुरू होणार ; शिक्षण विभागाने जाहीर केली नियमावली!

या संदर्भात काढण्यात आलेल्या परिपत्रकात सांगण्यात आले आहे की, इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग १डिसेंबर २०२१ पासून सुरू करण्यास मान्यता देण्यात आली आहे. परंतु जगभरात करोना विषाणूनचा नवा प्रकार ओमायक्रॉन आढळून आला असून व जागतिक आरोग्य संघटनेने या विषाणू प्रकारास Variant Of Concern म्हणून जाहीर केले आहे. या विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात होऊ नये यास्तव या विषाणू विरोधी प्रतिबंधात्मक उपाययोजना व आवश्यक ती खबरदारी घेणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर पुढील आदेश निर्गमित केले जात आहेत.

मुंबईत शाळा १ डिसेंबरला सुरू होणार नाहीत; पुणे-नाशिकमध्येही निर्णय लांबणीवर! Omicron चा फटका

पुणे महापालिका क्षेत्रातील इयत्ता पहिली ते सातवीचे वर्ग सुरू करण्यास १५ डिसेंबर २०२१ पर्यंत स्थगिती देण्यात येत असून, करोना विषयक परिस्थितीचा आढावा घेऊन याबाबबत १५ डिसेंबर २०२१ नंतर पुढील आदेश निर्गमित करण्यात येतील. इयत्ता पहिली ते सातवीचे नियमित वर्ग पुढील आदेशापर्यंत पूर्णत: बंद राहतील. मात्र ऑनलाईन शिक्षणास मूभा राहील.

नाशिकमध्ये पहिली ते सातवीपर्यंत शाळा सुरू करण्याचा निर्णय लांबणीवर!

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

हा आदेश पुणे महापालिका क्षेत्रामध्ये येणाऱ्या पुणे कटक मंडळ व खडकी कटक मंडळ यांना देखील लागू राहणार आहे. आदेशाचे, मार्गदर्शक सूचनांचे उल्लंघन करणारी व्यक्ती कार्यवाहीस पात्र राहील. असंही सांगण्यात आलं आहे.