भारत इतिहास संशोधक मंडळाच्या अध्यक्षपदी माजी खासदार प्रदीप रावत यांची फेरनिवड करण्यात आली. माजी प्राचार्य डाॅ. भगवंत कुलकर्णी यांची संस्थेच्या उपाध्यक्षपदी, ज्येष्ठ इतिहास संशोधक पांडुरंग बककवडे यांची चिटणीसपदी आणि माजी प्राचार्य नंदकुमार निकम यांची खजिनदारपदी निवड करण्यात आली.

हेही वाचा : पुणे: मारहाण प्रकरणात मिलिंद एकबोटे यांच्यासह आठ जणांची निर्दोष मुक्तता

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

संस्थेच्या नुकत्याच झालेल्या विश्वस्त मंडळाच्या बैठकीमध्ये या पदाधिकाऱ्यांची एकमताने निवड करण्यात आली. त्यापूर्वी झालेल्या बैठकीमध्ये नऊ विश्वस्तांची आगामी पाच वर्षांच्या कालावधीसाठी बिनविरोध निवड करण्यात आली होती. संस्थेच्या विश्वस्तांमध्ये डाॅ. अनुराधा कुलकर्णी, डाॅ. सर्जेराव भामरे, डाॅ. सचिन जोशी, मंदार लवाटे आणि संदीप तिखे यांचा समावेश आहे. ॲड. राजीव मराठे यांनी निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहिले.