पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए)च्या पेठ क्रमांक १२ येथील पंतप्रधान आवास योजनेअंतर्गतील पात्र दिव्यांगांना सदनिकांचा ताबा मिळावा या मागणीसाठी प्रहार अपंग क्रांती संघटनेने ८ मार्च रोजी आंदोलन केले. सदनिकांचा ताबा द्यावा. अन्यथा कुलूप तोडून ताबा घेऊ, असा इशारा दिव्यांगांनी दिला.

हेही वाचा >>>पुणे: बालिकेवर अत्याचार करणाऱ्या नराधमास २१ वर्ष सक्तमजुरी

आकुर्डीतील ‘पीएमआरडीए’च्या कार्यालयासमोर झालेल्या आंदोलनात संघटनेचे अध्यक्ष दत्तात्रय भोसले, उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे, महिला अध्यक्षा संगीता जोशी यांच्यासह दिव्यांग बांधव सहभागी झाले होते. महाराष्ट्र फेरीवाला महासंघाचे अध्यक्ष काशिनाथ नखाते आणि सेक्टर १२ कृती समितीने या आंदोलनाला पाठिंबा दिला. पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनी आंदोलन स्थळी येऊन दिव्यांगांचे निवेदन स्वीकारले.

पीएमआरडीएच्या वतीने पंतप्रधान आवास योजना पेठ क्रमांक १२ या ठिकाणी सुरू आहे. या योजनेअंतर्गत १६५ दिव्यांगांना सदनिका मिळाल्या आहेत. या सदनिकांचा ताबा त्वरित मिळावा. दिव्यांग बांधवांनी घरांची पूर्ण रक्कम भरूनही ताबा दिला जात नाही. पीएमआरडीने त्वरित ताबा द्यावा. अन्यथा आम्हाला कुलूप तोडून ताबा घ्यावा लागेल, असा इशारा उपाध्यक्ष राजेंद्र वाकचौरे यांनी दिला.

हेही वाचा >>>पुणे: पाठ्यपुस्तकांतील कोऱ्या पानांच्या निर्णयात बदल; आता दुसरी ते आठवीसाठी अंमबजावणी, नववी आणि दहावीला वगळले

सदनिकांचा ताबा २५ एप्रिलला देण्याचे नियोजित

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दिव्यांग लाभार्थ्यांना ताबा देण्यापूर्वी काही दिवस अगोदर सदनिकेची नोंदणी करण्याकरिता स्वतंत्र तारखा उपलब्ध करुन दिल्या जातील. त्यांची नोंदणी प्रक्रिया पूर्ण करण्यात येईल. सदनिकेचे हप्ते उशीरा भरणा-या लाभार्थ्यांना विलंब रकमेवर (पीएलआर) माफ करण्यासंदर्भात केलेली मागणी ही बाब धोरणात्मक आहे. त्याबाबत शासन स्तरावर निर्णय घेण्यासाठी निवेदन पाठविण्यात येईल. निवेदनातील इतर बाबींवर सहानुभूतीपूर्वक व नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात येईल. सदनिकांचा ताबा २५ एप्रिल २०२३ रोजी देण्याचे नियोजित असल्याचे लेखी पत्र पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल यांनी दिव्यांगांना दिले आहे.