महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे (एमपीएससी) राज्यसेवा मुख्य परीक्षा २०२१ या परीक्षेची सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आली. या परीक्षेत प्रमोद चौघुले यांनी राज्यात पहिला क्रमांक पटकावला असून, खुल्या गटात शुभम पाटील यांनी, तर महिला गटात सोनाली मात्रे यांनी पहिला क्रमांक मिळवला.   विशेष म्हणजे प्रमोद चौधुले यांनी सलग दुसऱ्यांदा पाहिला क्रनांक मिळवला आहे. आता उमेदवारांना ३ मार्च ते १० या कालावधीत पदासाठीचे पसंतीक्रम ऑनलाइन पद्धतीने नोंदवता येतील. पसंतीक्रमाच्या आधारे अंतिम निकाल प्रसिद्ध करण्यात येईल.

हेही वाचा >>> प्रस्तावित वीज दरवाढ मागे न घेतल्यास आंदोलन; बारामती इंडस्ट्रियल मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनचा इशारा

light
विश्लेषण: डोळे दिपवणारी रोषणाई प्रदूषणकारक आहे का ?
pune mba cet marathi news, mca cet marathi news
आणखी दोन अभ्यासक्रमांचे प्रवेश सीईटीद्वारे, अर्ज नोंदणीसाठी १८ एप्रिलपर्यंत मुदत
pune set exam marathi news, set exam registration marathi news
‘सेट’ परीक्षेसाठी उमेदवार नोंदणीत वाढ; पारंपरिक पद्धतीने होणारी शेवटची परीक्षा
talathi bharti
तलाठी भरतीच्या सुधारित गुणवत्ता यादीत अनेक अपात्र; ७० संशयितांचा निकालही थांबवला

एमपीएससीने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. प्रसिद्ध करण्यात आलेली सर्वसाधारण गुणवत्ता यादी तात्पुरत्या स्वरुपाची आहे. अर्जातील विविध दाव्यांच्या अनुषंगाने अंतिम निकालापूर्वी कागदपत्रे पडताळणी करताना काही उमेदवारांच्या दाव्यांमध्ये बदल होऊन उमेदवाराचा गुणवत्ता क्रम बदलू शकतो वा उमेदवार अपात्र ठरू शकतो. सर्वसाधारण गुणवत्ता यादी विविध न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या न्यायिक प्रकरणातील अंतिम न्यायानिर्णयाच्या अधीन राहून जाहीर करण्यात आल्याचे नमूद करण्यात आले आहे.  

हेही वाचा >>> ‘आप’चे पिंपरी-चिंचवडचे कार्याध्यक्ष चेतन बेंद्रे यांचे निलंबन रद्द

ऑनलाइन दुव्याद्वारे उपलब्ध करून देण्यात आलेल्या सर्व वीस संवर्गासाठी एक ते वीस पसंतीक्रम किंवा नो प्रेफरन्स पर्याय निवडणे आवश्यक आहे. या संवर्गांपैकी ज्या पदावरील निवडीसाठी इच्छुक आहे केवळ त्याच पदांसाठी पसंतीक्रम सादर करावेत. ज्या पदांच्या निवडीसाठी इच्छुक नाही त्या पदांसाठी नो प्रेफरन्स पर्याय निवडावा. पसंतीक्रम सादर केल्यानंतर ते पसंतीक्रम डाऊनलोड करून ठेवता येतील. पसंतीक्रम सादर करणारे उमेदवार ज्या संवर्ग पदांसाठी पसंतीक्रम सादर करतील त्याच पदांच्या निवडीसाठी त्यांचा विचार करण्यात येईल. पदांचे पसंतीक्रम सादर करण्याची किंवा बदलण्याची उमेदवाराची विनंती कोणत्याही परिस्थितीत मान्य केली जाणार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

दोन तासांत निकाल मुख्य परीक्षेतून मुलाखतीसाठी पात्र ठरलेल्या उमेदवारांच्या मुलाखती २७ डिसेंबर ते २८ फेब्रुवारी या कालावधीत घेण्यात आल्या. मुलाखती झाल्यानंतर दोन तासांत सर्वसाधारण गुणवत्ता यादी जाहीर करण्यात आल्याची माहिती एमपीएससीने दिली.