पुणे : ओैंध परिसरात मसाज सेंटरच्या नावाखाली सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा प्रकार गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाने उघडकीस आणला. पोलिसांनी या कारवाईत चार परदेशी तरुणींसह सहा जणींना ताब्यात घेतले. तसेच मसाज सेंटरच्या व्यवस्थापकास अटक केली.

सागर श्याम पवार (वय ३२, रा. गवळी वाडा, लोणावळा) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. या प्रकरणी मनीष इश्वर मुथा (रा. कोंढवा), राहुल जिगजिनी यांच्यासह तिघां विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ओैंधमधील एका इमारतीत ‘ऑरा स्पा’मध्ये वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागाला मिळाली. पोलिसांनी बनावट ग्राहकाच्या माध्यमातून खातरजमा केली. मसाज सेंटरमधील व्यवस्थापक सागर पवार याच्यासह सहा तरुणींना ताब्यात घेण्यात आले.
या कारवाईत ताब्यात घेण्यात आलेल्या चार तरुणी थायलंडमधील आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेश पुराणिक, उपनिरीक्षक सुप्रिया पंढरकर, राजश्री मोहिते, अश्विनी केकाण, स्नेहा धुरी, प्रमोद मोहिते आदींनी ही कारवाई केली. गेल्या आठवड्यात सामाजिक सुरक्षा विभागाने बाणेर भागात एका मसाज सेंटरवर कारवाई करून वेश्या व्यवसायाचा प्रकार उघडकीस आणला होता.