लोणवळा : पुणे पोलीस दलात कार्यरत असणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकाने लोणावळ्यात गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. अण्णा गुंजाळ असं आत्महत्या केलेल्या पोलीस उपनिरीक्षकाचे नाव आहे. याप्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलीस अधिक तपास करत आहेत.

गेल्या तीन ते चार दिवसापासून अण्णा गुंजाळ हे बेपत्ता होते. त्यांचा फोन देखील लागत नव्हता. आज खडकी पोलीस ठाण्यात ते बेपत्ता असल्याची तक्रार देणार होते. त्यापूर्वी अण्णा गुंजाळ यांनी गळफास घेतल्याची घटना समोर आली आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लोणावळ्यातील टायगर पॉईंट येथील शिवलिंग पॉईंट या ठिकाणी त्यांनी गळफास घेऊन आपलं जीवन संपवल आहे. अण्णा गुंजाळ यांनी नेमकी आत्महत्या का केली आहे. हे अस्पष्ट आहे. या घटनेचा अधिक तपास लोणावळा ग्रामीण पोलीस करत आहेत. खडकी पोलीस ठाण्यात अण्णा गुंजाळ हे कार्यरत होते.