पराग प्रकाशनतर्फे प्रसिद्ध सिनेपत्रकार, आशय फिल्म क्लबचे संस्थापक-सचिव आणि चित्रपट चळवळीचे संयोजक सतीश जकातदार यांच्या षष्टय़ब्दीनिमित्त त्यांच्या निवडक लेखांचा संग्रह असलेल्या ‘हकिकत सिनेमाची’ या पुस्तकाचे प्रकाशन २७ ऑक्टोबर रोजी ग्रंथाली वाचक चळवळीचे अध्वर्यू दिनकर गांगल यांच्या हस्ते होणार आहे. राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या प्रेक्षागृहात सायंकाळी सहा वाजता होणाऱ्या कार्यक्रमास फेडरेशन ऑफ फिल्म सोसायटी ऑफ इंडियाचे सचिव सुधीर नांदगावकर, चित्रपट निर्माते आणि व्ही. शांताराम फाउंडेशनचे अध्यक्ष किरण शांताराम, ज्येष्ठ पत्रकार विजय कुवळेकर उपस्थित राहणार आहेत. उत्तरार्धात राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयाच्या वाटचालीवर आधारित सतीश जकातदार दिग्दर्शित ‘प्रिझव्र्हेशन ऑफ मूव्हिंग इमेजेस’ हा वंदना भाले यांची निर्मिती असलेला लघुपट दाखविण्यात येणार असल्याचे विजय जकातदार यांनी कळविले आहे.