scorecardresearch

पुणे : किराणा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक ; चौघांविरूद्ध गुन्हा

इंदापूर परिसरातील एका किराणा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पुणे : किराणा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक ; चौघांविरूद्ध गुन्हा
खोट्या कागदपत्रांच्या आधारे धान खरेदी केंद्रात ८ कोटी ५६ लाखांचा घोटाळा

इंदापूर परिसरातील एका किराणा व्यापाऱ्याची २४ लाखांची फसवणूक केल्या प्रकरणी चौघांविरूद्ध भारती विद्यापीठ पोलिसांकडून गुन्हा दाखल करण्यात आला आहे.सुशीलकुमार त्रिवेदी, वंदना दायमा, भारत दायमा, राणी दायमा अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सचिन निवृत्ती नरुटे (वय ३०, रा. काझड, इंदापूर, जि. पुणे) यांनी या संदर्भात भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा >>> पुणे : मोटार अपघातात महाविद्यालयीन युवकांचा मृत्यू ; सासवड-कापूरहोळ रस्त्यावर अपघात; पाच जण जखमी

नरुटे यांचे किराणा दुकान आहे. आरोपींनी त्यांना अन्नधान्याचा पुरवठा करण्याचे आमिष दाखवून त्यांच्याकडून ऑनलाइन पद्धतीने २४ लाख नऊ हजार रुपये घेतले होते. पैसे दिल्यानंतर आरोपींनी नरुटे यांना अन्नधान्याचा पुरवठा केला नाही. नरुटे यांनी आरोपींकडे विचारणा केली. मात्र, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर नरुटे यांनी पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक पाटील तपास करत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

संबंधित बातम्या