पुणे : बेकायदा देशी बनावटीचे पिस्तूल बाळगणाऱ्या मुंबईतील सराइताला गुन्हे शाखेने अटक केली. हडपसर भागातील सय्यदनगर परिसरात ही कारवाई करण्यात आली. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल, तसेच काडतूस जप्त करण्यात आले.

रेहान नझीर कुरेशी (वय ३४, रा. लिंबोनी बाग, गोवंडी, मुंबई) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. हडपसर भागात देशी बनावटीचे पिस्तूल बाळगल्याप्रकरणी साहिल राजू शेख (वय २४) आणि जैद जावेद खान (वय २२) यांना गुन्हे शाखेच्या युनिट सहाकडून अटक करण्यात आली होती. त्यांच्याकडून तीन पिस्तूले आणि चार काडतुसे जप्त करण्यात आली होती. याप्रकरणात त्यांचा साथीदार रेहान कुरेशी पसार झाला होता. कुरेशी हडपसर भागातील सय्यदनगर परिसरात येणार असल्याची माहिती पोलीस निरीक्षक वाहिद पठाण यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. त्याच्याकडून देशी बनावटीचे पिस्तूल आणि एक काडतूस जप्त करण्यात आले.

हेही वाचा – पुणे : कामाचे पैसे मागितल्याने दोघांवर कोयत्याने वार, खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी एकाला अटक

हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये महानगरपालिका प्रशासन ‘ॲक्शन मोड’वर! अनधिकृत बांधकामे, पत्राशेडवर कारवाई

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पोलीस उपायुक्त निखील पिंगळे, सहायक आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, उपनिरीक्षक रामकृष्ण दळवी आदी पोलिसांनी ही कारवाई केली.